loader image
[ays_poll id=7]

सप्तश्रृंगी गड ते नांदुरी घाटमार्गाचे होणार काँक्रिटीकरण- १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत मार्ग राहणार बंद

Sep 9, 2026

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील शक्तिपीठ सप्तश्रृंगीगड येथील सप्तश्रृंगीगड – नांदुरी – अभोणा – कनाशी – मानूर – अलियाबाद रामा-२१ किमी ०/०० ते १०/०० मध्ये रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम हे काम केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मंजूर असून सदर कामाअंतर्गत मौजे सप्तश्रृंगीगड ते नांदुरी घाट मार्गातील रस्त्याचे काम सा.बा. उपविभाग क्रमांक ४ कळवण अंतर्गत सुरू आहे.

त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, सा.बा. उपविभाग क्रमांक ४ कळवण, कॅम्प नाशिक यांचेकडील पत्र जावक क्रमांक/प्रशा/३२२/२०२६ दिनांक ३१/०८/२०२६ अन्वये मौजे सप्तश्रृंगीगड ते नांदुरी रस्त्यावरील घाटमार्गामध्ये काँक्रिटीकरणाचे काम करत असताना वाहतूक वळविण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. वरील रस्त्यावर वाहतूक सुरू असल्यास काम पूर्ण क्षमतेने तसेच विहित वेळेत पूर्ण करणे शक्य होणार नाही. तसेच आगामी कुंभमेळा २०२७ मध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सप्तश्रृंगीगड ते नांदुरी रस्ता वाहतूक दि. १०/०९/२०२६ ते दि. २६/०९/२०२६ या कालावधीत बंद राहणार असून भाविकांनी याची नोंद घ्यावी

त्याअनुषंगाने, सप्तश्रृंगीगड ते नांदुरी घाटमार्गामध्ये रस्त्याचे काँक्रिटीकरण काम सुरू असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दि. १०/०९/२०२६ ते दि. २६/०९/२०२६ या वेळेत व दिनांकास वाहतूक बंद करणे आवश्यक आहे. तसेच, सदर रस्त्यावर पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्याचे काम नियोजित वेळेत होणे आवश्यक असल्याने रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
.