loader image
[ays_poll id=7]

अस्मानी संकटा पाठोपाठ तलाठी संपामुळे बळीराजा हतबल

Sep 18, 2026

आधीच अस्मानी संकटाने होरपळलेल्या बळीराजावर आता तलाठी संपामुळे दुहेरी संकट ओढवले आहे. तलाठ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा न निघाल्याने संप कायम आहे. संपामुळे महसूलचे कामकाज ठप्प पडले असून, नागरिकांचे हाल होत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात गुरुवार (ता. १७)पासून सेवा पंधरवडा राबविण्यात येत असतानाच तलाठी संपावर ठाम असल्याने प्रशासन कोंडीत सापडले आहे. तलाठ्यांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले. परिणामी जिल्ह्यातील महसूलच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. गावपातळीवर विविध दाखले, सातबारा फेरफार, पीककर्जासाठी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा चढविणे अशी निरनिराळ्या प्रकारची कामे ठप्प झाली. परिणामी शेतकरी व जनतेचे हाल झाले असून, तलाठी कार्यालयातून रिकाम्या हाती त्यांना परतावे लागले. राज्य सरकारतर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पंधरवड्यात आदिवासी वनपट्टेधारकांना सात-तीन १२-ई अंतर्गत सातबाऱ्यांचे वाटप केले जाणार आहे. तसेच जनतेची कामे मार्गी लावण्याचे उद्दिष्ट सरकारने दिले आहे. मात्र, पंधरवड्यावर तलाठी संपाचे सावट आहे. त्यामुळे तलाठ्यांनी संप मागे घ्यावा, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराचे आराध्य दैवत व  नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 30 व्या वर्षी यंदाही सलग 12 दिवस ➖️भाद्रपद महागणेशोत्सव 2026

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 30 व्या वर्षी यंदाही सलग 12 दिवस ➖️भाद्रपद महागणेशोत्सव 2026

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द असणार्‍या...

read more
ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनमाड शहराच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन मनमाड (प्रतिनिधी)

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनमाड शहराच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन मनमाड (प्रतिनिधी)

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत अवमानकारक आणि आक्षेपार्ह...

read more
सप्तश्रृंगी गड ते नांदुरी घाटमार्गाचे होणार काँक्रिटीकरण- १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत मार्ग राहणार बंद

सप्तश्रृंगी गड ते नांदुरी घाटमार्गाचे होणार काँक्रिटीकरण- १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत मार्ग राहणार बंद

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील शक्तिपीठ सप्तश्रृंगीगड येथील सप्तश्रृंगीगड – नांदुरी – अभोणा –...

read more
डीएमआयसीच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्याच्या समावेशासाठी भुजबळांचे केंद्राला साकडे

डीएमआयसीच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्याच्या समावेशासाठी भुजबळांचे केंद्राला साकडे

नाशिकच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या (DMIC) दुसऱ्या...

read more
.