loader image
[ays_poll id=7]

नांदगाव विधानसभा भाजपा आढावा बैठक संपन्न

Sep 21, 2026


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा संकल्प अभियानांतर्गत व प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा
नांदगांव विधानसभा मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आढावा बैठक संपन्न झाली.
मनमाड येथील पल्लवी मंगल कार्यालय, मनमाड येथे पार पडलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेत्या जयश्री दौंड या होत्या. नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर व्हावा, जनावरांसाठी चारा छावण्या, ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा, नांदगाव तालुका कायमस्वरूपी दुष्काळमुक्त होण्यासाठी उपाययोजना आदि विषयांवार ठराव पारित करून याचा पाठपुरावा करणेबाबत अध्यक्षांनी सूचना केल्या.
भाजपाचे विधानसभा प्रमुख गणेश धात्रक यांनी सदर बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी आपल्या मनोगतात सेवा संकल्प अभियान व नरेंद्र मोदी यांच्या कामाबद्दल माहिती दिली तर बाजार समितीचे माजी सभापती दिपक गोगड यांनी तलाठी कामबंद आंदोलन बाबत सूचना मांडली. तलाठी आंदोलन लवकर न संपल्यास त्यामुळे पीक पंचनामे व इतर कामात येणाऱ्या अडथळे निदर्शनास आणून दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा जयश्री दौंड यांनी सेवा संकल्प अभियान, आजची पक्षाची भूमिका, पक्ष संघटन, आदि बाबत मार्गदर्शन केले. गणेश धात्रक यांनी अशाच बैठकांचे तालुक्यातील गावोगावी आयोजन करून पक्ष संघटन मजबूत करण्याचा मानस बोलून दाखवला तसेच बैठकीत पारित सर्व ठराव राज्य शासनाकडून मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. नांदगाव तालुक्याचा नार-पार मध्ये समावेश करून तालुक्यात पाटचाऱ्यांचे जाळे निर्माण करून तालुक्याच्या दुष्काळवर कायमस्वरूपी उपाययोजना निर्माण करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचेही धात्रक यांनी सांगितले.

स्थानिक तांडयावरील कलाकार यांनी जिद्द मेहनतीने तयार केलेल्या छबिला या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्या बद्दल निर्माते व कलाकार यांना प्रोत्साहन देण्यासाठी छबिला चित्रपट टीमचा सन्मान करण्यात आला.
बैठकीत नांदगांव विधानसभा मतदारसंघात नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पक्ष पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले. बैठकीस मा. प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, सर्व मोर्चा व आघाडी पदाधिकारी, मंडल प्रमुख, मंडल प्रभारी, बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, बी.एल.ए-२, महिला आघाडी, जिल्हा व मंडल पदाधिकारी प्रमुख,
सर्व ज्येष्ठ नेते व पदाधिकारी, सदस्य भारतीय जनता पार्टी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.