loader image
[ays_poll id=7]

तालुका तात्काळ दुष्काळी जाहीर करावा – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने तहसीलदारांना निवेदन

Sep 21, 2026

पावसाने पाठ फिरवल्यामुळे नांदगाव तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांसमोर उभे पिक करपून गेले असून चारा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, तालुक्यात तात्काळ ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करावा आणि बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी तातडीची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख प्रवीण नाईक व तालुकाप्रमुख संतोष गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात,

कोरडा दुष्काळ जाहीर करा : कोणतीही जाचक अट न लावता संपूर्ण नांदगाव तालुका तातडीने ‘कोरडा दुष्काळग्रस्त’ म्हणून घोषित करण्यात यावा.

प्रति हेक्टरी भरीव मदत : जिरायती/कोरडवाहू पिकांसाठी प्रति हेक्टरी किमान ५० हजार रुपये, तर बागायती व फळबागांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टरी १ लाख रुपयांची मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावी. ​मदतीची मर्यादा: ही भरपाई ३ हेक्टरच्या मर्यादेत न ठेवता, नुकसान झालेल्या सर्व क्षेत्राला (अटी-शर्तींशिवाय) लागू करण्यात यावी.

विमा नुकसान भरपाई : पीक विमा योजनेअंतर्गत कोणत्याही अटी न लावता, ‘लोकल कॅलॅमिटी’ व ‘मिड-सीझन ॲडव्हर्सिटी’ नियमांनुसार सर्व बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी अग्रिम (Advance) २५% भरपाई तातडीने मंजूर करण्यात यावी.

दुष्काळी उपाययोजना : तालुक्यात तातडीने जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्सची संख्या वाढवावी आणि रोहयो (रोजगार हमी योजना) अंतर्गत कामे उपलब्ध करून द्यावीत.

कर्ज व वीजबिल माफी : संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची बँक कर्जे आणि वीजबिल पूर्णपणे माफ करण्यात यावे. तसेच यावर्षी किमान पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे याची तहसीलदार साहेबांनी योग्य निरीक्षण करून शासनाला माहिती दयावी, या मागण्या करण्यात आल्या आहेत.

शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आणि तातडीने मदत न दिल्यास तालुक्यातील हवालदिल शेतकऱ्यांना सोबत घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख प्रवीण नाईक यांनी दिला आहे.

निवेदन देतांना शिवसेनेचे तालुका उपप्रमुख राजाभाऊ धोंडगे, बाळासाहेब चव्हाण, अशोक पदमर, दिलीप नंद, ज्येष्ठ शिवसैनिक राजाभाऊ आहेर, नांदगाव शहरप्रमुख श्रावण आढाव, मनमाड शहरप्रमुख माधव शेलार, जाफर मिर्झा, नायडोंगरी शहरप्रमुख निवृत्ती गुंजाळ, बोलठाण शहरप्रमुख सतीश बारावकर प्रवीण सूर्यवंशी, मायकल फर्नांडीस, तालुका संघटक रवींद्र अमराळे, तालुका सचिव शैलेश सोनवणे, नगरसेवक अमोल नरवडे, दीपक दराडे, संजय कटारे, युवासेनेचे सौवय निकम, वसंत नागरे, राजाभाऊ वाघ, भाऊ साहेब सदगीर, दत्तू सानप, विजय शिनगारे, प्रकाश चावरिया, सीताराम राठोड, बबन आव्हाड, प्रमोद मोरे, गौतम जैन, ज्ञाणेश्वर पवार, अनिल रिडे, दामू सापटे, मधू दरेकर,, बबन उगले, अशपाक सैय्यद, गोरखनाथ बिछाले, यादव मोरे, दत्तू इप्पर, नागुमामा इंगळे, सूर्यभान खैरनार, चेतन चावरिया, आदेश शिंदे, विष्णू सोनवणे, रमेश बोडखे, नानासाहेब आहेर, अथर्व मोरे, मनोज अंकुश आदींसह शिवसैनिक व शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.