loader image
[ays_poll id=7]

गोळाफेक आणि थाळीफेक स्पर्धेत केआरटीची झेप

Sep 23, 2026


मनमाड- कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँण्ड ज्यु. कॉलेज, मनमाडची विद्यार्थिनी कु मानसी कुणगर हिने १७ वर्षांखालील (Under-17) गटात गोळाफेक आणि थाळीफेक या दोन्ही प्रकारांत तालूकास्तरावर दुसरे स्थान मिळवले असून तिची जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

मानसीच्या या दुहेरी यशाबद्दल शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर यांनी तिच्या खेळाचे विशेष कौतुक केले. प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. दीपक व्यवहारे, संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री. वैभव कुलकर्णी आणि श्री. धनंजय निंभोरकर यांनी मानसीचे अभिनंदन केले आहे.

आगामी जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

या खेळाडूंना क्रीडा शिक्षक श्री. मोहित बिडगर, श्री. राकेश संसारे आणि क्रीडा प्रशिक्षक श्री. मनोज ठोंबरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

सदर तालुकास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक आणि जिल्हा क्रीडा परिषद, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव येथील ‘महात्मा गांधी विद्यामंदिर’ येथे आयोजित करण्यात आल्या होत्या


अजून बातम्या वाचा..

विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

शाळा सोडल्यानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावर शाळेच्या दाखल्यावर जन्मतारीख, स्वतःचे नाव, वडिलांचे...

read more
दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

पावसाने पाठ फिरविल्यामुळे मतदार संघात दुष्काळ सदृश्य परिस्तिथी निर्माण झाली असून आज पाऊस जरी पडला...

read more
.