loader image
[ays_poll id=7]

नागपूर येथे शिक्षक स्वागत समारंभ व साहित्य वाटप संपन्न

Sep 23, 2026

नागापूर येथे पवित्र पोर्टल मार्फत नवीन नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या स्वागत समारंभ व नागापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी व साठवणूक करण्यासाठी आवश्यक साहित्य वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

विद्यार्थ्यांची प्रगती म्हणजे गावाची प्रगती गावाच्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी जे आवश्यक आहे ते सर्व शाळेला देण्यासाठी नागापूर ग्रामपंचायत कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन नागापूर गावचे लोकनियुक्त सरपंच राजेंद्र पवार यांनी केले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी ग्रामपंचायतच्या वतीने मोफत सावित्रीबाई फुले अभ्यासिका, मोफत व्यायामशाळा, सुसज्ज ग्रंथालय या योजना राबवल्या जात आहेत. यांचा उपयोग करून अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवले आहे. आवश्यकतेनुसार जिल्हा परिषद शाळांना देखील जे जे साहित्य गरजेचे असेल ते ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, विविध पेट्रोलियम कंपन्या तसेच इतर संस्थांच्या माध्यमातून ते पुरवले जाईल विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक उपक्रम शाळेत राबवले जावेत त्या सर्वांना आमची साथ राहील असे त्यांनी आश्वासन दिले लवकरच गावातील सर्व अंगणवाड्यांच्या विकासासाठी योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपसरपंच रवींद्र नगे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मोरे, निलेश पवार, शिवसेनेचे गणेश पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश आहेर, समाधान बोडके, निवृत्ती पवार, सोपान गायकवाड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक चंद्रशेखर उदावंत यांनी केले तर आभार उत्तम नगे यांनी मानले यावेळी मनोज पवार, दत्तात्रय जाधव, शिवाजी काजीकर, सीमा पाटील ,योगिता अहिरराव ,शिल्पा पाटील, पांडुरंग कदम, निकिता पायघन,गीता गरुड यांच्यासह अनेक मान्यवर व शिक्षक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव येथे भव्य...

read more
मनमाड –स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने  अंधेरी येथील होली फॅमिली हायस्कूलमध्ये विज्ञान व गणित तसेच इतर विषयाशी संबंधित शैक्षणिक विषयांवर आधारित आंतर शालेय स्पर्धेत येथील सेंट झेवियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक कामगिरी करून घवघवीत यश मिळवले‌

मनमाड --स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने अंधेरी येथील होली फॅमिली...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

  शनिवार, दि.08 फेब्रुवारी 2026 रोजी कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

  मनमाड शहर भाजपा च्या वतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक व भाजपा च्या कार्यकर्त्यांन चे प्रेरणा...

read more
एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

  मनमाड : इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 केंद्र क्रमांक 0236 एच.ए....

read more
शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

      मनमाड : येथील शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या सिद्धी क्लासेस...

read more
.