loader image
[ays_poll id=7]

करंजवण पंपिंग स्टेशनमधील तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

Sep 24, 2026


मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या करंजवण धरण येथील पंपिंग स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मनमाड शहरातील नियमित होत असलेला पाणीपुरवठा खंडित झाला आहे. अचानक उद्भवलेल्या या तांत्रिक अडचणीमुळे शहरातील नागरिकांना पाण्याअभावी त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान, सदरील तांत्रिक बिघाडाची तातडीने दखल घेत मनमाड नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून, शक्य तितक्या लवकर पंपिंग व्यवस्था कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर मनमाड शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत व सुरळीत करण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत सहकार्य करावे, असे आवाहन मनमाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी, नगराध्यक्ष योगेश पाटील व पाणीपुरवठा सभापती विशाल अहिरे यांनी केले आहे.


अजून बातम्या वाचा..

सात समुद्रापार अनिवासी भारतीय भक्ताकडून शिर्डीच्या साई बाबांना चांदीची छत्र अर्पण

सात समुद्रापार अनिवासी भारतीय भक्ताकडून शिर्डीच्या साई बाबांना चांदीची छत्र अर्पण

      सात समुद्रापार अनिवासी भारतीय भक्ताकडून शिर्डीच्या साई बाबांना चांदीची छत्र अर्पण अमेरिकेतील...

read more
मनमाड शहराचे चे आराध्य दैवत श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना  पालखी मिरवणुक पारंपरिक   थाटात संपन्न

मनमाड शहराचे चे आराध्य दैवत श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना पालखी मिरवणुक पारंपरिक थाटात संपन्न

                         मनमाड शहराचे चे आराध्य दैवत श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना...

read more
.