loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्यात कोरड्या दुष्काळाची दाहकता – आमदार कांदेंच्या पाठपुराव्याला यश ‘ट्रिगर १’ लागू

Sep 24, 2026

नांदगाव तालुक्यात कोरड्या दुष्काळाची दाहकता – आमदार कांदेंच्या पाठपुराव्याला यश ‘ट्रिगर १’ लागू

मनमाड – नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून नांदगाव तालुक्यात निर्माण झालेल्या परिस्थितीची शासनाने दखल घेऊन दुष्काळाचा ट्रिगर १ लागू करण्यात आला. ट्रिगर लागू करण्यात आल्यामुळे लवकरच नांदगाव मतदारसंघात कोरडा दुष्काळ म्हणून जाहीर होईल, असा विश्वास आमदार कांदे यांनी व्यक्त केला. ट्रिगर १ लागू करण्यात आल्यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर होऊन आमदार सुहास कांदे यांनी सरकारकडून भरिव मदत मिळेल अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

मनमाड, नांदगाव शहरासह संपूर्ण तालुक्यात जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होऊन पुढे चांगला पाऊस होईल या आशेने त्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली.

६२,३८१
हेक्टरवर नांदगाव
तालुक्यात पिकांची
लागवड

पिकनिहाय लागवडीखालील क्षेत्र

मका
२१,२२३
हेक्टर

बाजरी
१४,५७१
हेक्टर

ज्वारी
११,६२
हेक्टर

तूर
५२८.४४
हेक्टर

मूग
३,५८८
हेक्टर

उडीद
३२७
हेक्टर

भुईमूग
२,३१५
हेक्टर

सोयाबीन
४७३
हेक्टर

कापूस
१,०३३
हेक्टर

पिकांचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट असून दुष्काळाची दाहकता ही तालुक्यात प्रचंड प्रमाणात आहेत.

पेरणीनंतर पावसाने हजेरी लावल्यामुळे पिके चांगली बहरली होती; मात्र त्यानंतर दोन महिन्यापासून दडी मारल्याने आणि कडक उन्हामुळे पिके पार करपून गेली आहेत. तीन महिने उलटून गेला नाही- नाही कोरडा असून तिहेरी तग गाठला आहे. त्यामुळे खरीप हंगाम पार हातातून गेला असून पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. तालुक्यातील या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार सुहास कांदे यांनी नांदगाव तालुक्यातील महसूल व कृषी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनाकडे पाठवण्याचे निर्देश दिले होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार व कृषी मंत्र्यांना निवेदन देऊन नांदगाव मतदारसंघाचा ट्रिगर १ मध्ये समावेश करण्याची मागणी केली होती.
नांदगाव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. आ. सुहास कांदे यांनी या बाबत पाण्यासाठी ऊर भरून यावे असून, राज्य सरकारने नांदगाव तालुक्याचा ‘ट्रिगर १’ (दुष्काळसदृश परिस्थिती) मध्ये समावेश केला आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
.