loader image
[ays_poll id=7]

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीच्या पालखी विसर्जन मिरवणुकीत व्यसन मुक्तीचा सामाजिक संदेश

Sep 26, 2026

मनमाड – मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व सार्वजनिक गणेश उत्सवातील प्रथम मानाचा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द असणारा वेशीतील श्री निलमणी गणेश मंडळाच्या पार्थिव गणेश मुर्तीची विसर्जन महामिरवणुक लोकमान्य टिळकांचा आदर्श ठेवत पारंपारिक व धार्मिक संस्कृतीचे दर्शन घडवत पारंपरिक व साध्या पद्धतीने सकाळी संपन्न झाली. ❗आम्ही परंपरा पाळतो, आम्ही संस्कृतीचे रक्षण करतो❗ हे ब्रीदवाक्य घेवून श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे 1997 पासून यंदा सलग 30 व्या वर्षी या मिरवणुकीचे सकाळी आयोजन करण्यात आले होते.मनमाड नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी सपत्नीक निलमणी मंदिरात महाआरती करून या पालखी मिरवणुकीच्या शुभारंभाचा नारळ वाढविला .या जल्लोष पूर्ण मिरवणुकीमध्ये मिरवणूक मार्गावर आकर्षक सुशोभित रांगोळी, महाराष्ट्राची लोकपरंपरा सांगणारे गोंधळी पथकाने पालखी पुढे लोककला सादर केली मिरवणुकीची शिवकालीन दवंडी देण्यात आली ,वाद्यवृंद (बॅण्ड), सनई चौघडा, घोडेस्वार युवती, पारंपारिक वेशात होती यंदा श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट द्वारे मिरवणुकीत 10 शालेय विद्यार्थिनीनी व्यसन मुक्ती संदर्भात समाज प्रबोधन करणारी 20 बॅनर पालखी समोर पकडत भारताला व्यसन मुक्त करू या असा संदेश दिला ही संकल्पना पालखी मिरवणूकीचे मुख्य आकर्षण ठरली आणि मानाच्या पालखी समोर चंद्र सूर्य, (मानाची अब्दागिरी ) भगवा ध्वज,आणि सुगंधीत फुलांनी सजवलेली श्री निलमणीच्या पार्थिव मुर्तीची सुशोभित फुलानी सजवलेली पालखी, ही विशेष आकर्षणे ठरली. श्री निलमणीच्या पालखीजवळ शंखनादाने श्री गणेशाच्या जयजयकाराने परिसर दुमदुमला. तर मिरवणुकीत सर्व भाविकांना खडीसाखरेचा व मोदकाचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. या श्री निलमणीच्या पालखीतील पार्थिव मूर्ती ला मिरवणुक मार्गावर महिलांनी ठिकठिकाणी औक्षण /आरती केली या श्री निलमणीच्या मिरवणुकीचे संयोजन श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे विश्‍वस्त अध्यक्ष किशोर गुजराथी, सचिव नितीन पांडे, विश्वस्त शेखर पांगुळ, गोविंद रसाळ, प्रज्ञेश खांदाट,नारायण फुलवाणी, भिकाजी कुलकर्णी यांनी केले. तर या मिरवणुकीत श्री निलमणी गणेश मंडळाचे , भरत छाबडा, अक्षय सानप, संदीप सिनकर शिवाजी सानप, अभिषेक पितृभक्त , दिपक शिंदे, मनोज पवार राहुल लांबोळे, क्रांती आव्हाड,नीलकंठ त्रिभुवन,मच्छीद्र साळी, मनोज छाबडा, योगेश म्हस्के जव्हेरीलाल धांदल , राजेश निकुंभ, उपेंद्र पाठक, महेश बोराडे, बबलू बन्सल,आदी प्रमुखांसह श्री गणेश भक्त भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.सरस्वती विद्यालयच्या सौ. योगिता देशपांडे, सायली पेंडसे याचे सहकार्य या मिरवणूकीस मिळाले शहरातील मुख्य चौकात श्री निलमणी च्या पालखी वर जोरदार पुष्पवृष्टी केली. या पालखी मिरवणूकीत मोठ्या संख्येने महिला, युवक युवती आबाल वृद्ध सहभागी झाले या पारंपरिक मिरवणुकीस पहाणे साठी शहरातील नागरिकांनी मिरवणूक मार्गावर दूतर्फा मोठी गर्दी केली होती मनमाड शहर पोलीस स्टेशन चे निरीक्षक विजय करे यांचे मार्गदर्शना मध्ये या पालखी मिरवणुकीसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्टतर्फे विश्वस्त मंडळा तर्फे या पालखी मिरवणुकीचे संयोजन करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी   रुपये 1,09,000/- किंमतीचे विक्रमी शिल्लक औषधं संकलन ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रुपये 1,09,000/- किंमतीचे विक्रमी शिल्लक औषधं संकलन ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथील कवि रबिंद्रनाथ टागोर एज्युकेशन सोसायटीचे २३ वर्ष पूर्ण करून २४ व्या वर्षात पदार्पण

मनमाड येथील कवि रबिंद्रनाथ टागोर एज्युकेशन सोसायटीचे २३ वर्ष पूर्ण करून २४ व्या वर्षात पदार्पण

मनमाड शहरातील अग्रगण्य अशा या शिक्षणसंस्थेचा २३ वा वर्धापन दिन कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल आणि...

read more
गुरुद्वारा मध्ये येणाऱ्या भाविकांनी पवित्र्य राखावे – मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंहजी यांचे आवाहन

गुरुद्वारा मध्ये येणाऱ्या भाविकांनी पवित्र्य राखावे – मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंहजी यांचे आवाहन

मनमाड : मनमाड शहरातील गुरुद्वारा हा आपल्या भारत देशातील शिख धार्मियांचा अत्यंत पवित्र आणि मुख्य...

read more
मनमाड साहित्य संघ आयोजित काव्यस्पर्धेची अंतिम फेरी व* पारितोषिक वितरण समारंभ येत्या २७  फेब्रुवारी रोजी.

मनमाड साहित्य संघ आयोजित काव्यस्पर्धेची अंतिम फेरी व* पारितोषिक वितरण समारंभ येत्या २७ फेब्रुवारी रोजी.

मराठी भाषा गौरव दिनानिमिताने कार्यक्रम मनमाड(प्रतिनिधी)- मनमाड साहित्य संघाने आयोजित केलेल्या...

read more
मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या उपक्रमात नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच पत्रकारांनी हातात झाडू घेऊन उद्यानाची संपूर्ण स्वच्छता केली....

read more
नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा “वसंतराव काणे आदर्श तालुका...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर...

read more
मनमाड ता. २७  : महाराष्ट्राला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समृद्ध ऐतिहासिक ठेवा मोबाईलमध्ये गुंतलेल्या आजच्या तरुण पिढीच्या मनामनांत रुजावा यासाठी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ आणि मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित केलेला गड किल्ले बांधणीचा आदर्श उपक्रम हा समाजातील युवा पिढीशी मातीची बांधिलकी निर्माण करणारा आहे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक विजय करे यांनी येथे केले.

[contact-field...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

स्वराज्य चे संस्थापक महापराक्रमी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जयंती निमित्ताने...

read more
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव येथे भव्य...

read more
.