loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात ‘आविष्कार–२०२६’ संपन्न.

Sep 28, 2026


विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देणाऱ्या ‘आविष्कार–२०२६’ संशोधन स्पर्धेचे आयोजन महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे उत्साहात करण्यात आले. या स्पर्धेला पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेमध्ये पंचवीसपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील आपल्या संशोधन संकल्पना आकर्षक पोस्टर्सच्या माध्यमातून सादर केल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. जी. आंबेकर, उपप्राचार्य डॉ. बी. एस. देसले तसेच स्पर्धेसाठी निमंत्रित परीक्षक व प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. सी. जी. दिघावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. पी. जी. आंबेकर आणि प्रमुख पाहुणे डॉ. सी. जी. दिघावकर यांनी विद्यार्थ्यांच्या पोस्टर्सची बारकाईने पाहणी करून त्यांच्या संशोधन संकल्पना समजून घेतल्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी संशोधनाची दिशा, विषयाची निवड, नावीन्यता तसेच संशोधनाची उपयुक्तता याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना संशोधनाच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळाली. यावेळी महाविद्यालयाचे कुलसचिव श्री. समाधान केदारे, प्रा. डॉ. पी. टी. वानखेडे, समन्वयक, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे शैक्षणिक व संशोधक समन्वयक डॉ. आर. एस. काळे यांनी केले. डॉ. आरती छाजेड, डॉ. स्वप्नाली पाटील-पांडे तसेच विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला प्रोत्साहन देणारा आणि नवकल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
.