loader image
[ays_poll id=7]

अंडरपास दुरुस्तीसाठी बंद झाल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना करावी – संतोष गुप्ता

Sep 30, 2026


रेल्वे प्रशासनाने कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता नांदगाव शहरातील रेल्वे अंडरपास मध्ये दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. सदर दुरुस्तीचे काम साधारण 10 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे, यामुळे नदीपात्रात असलेल्या रेल्वे पुलाकडून संपूर्ण वाहतूक वळविण्यात आली आहे. रेल्वे पूलामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे, यावर तात्काळ उपाययोजना करावी व मोरी मधील रोड दुरुस्त करावा जेणेकरून त्या रस्त्यावरून जाणाऱ्या विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना त्रास होणार नाही, त्यांना अति वाहतूकीमुळे रेल्वे पुलावाच्या वरील ट्रॅकवरून ये-जा करावी लागत आहे, त्यामुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे व अरुंद रस्ता असल्याने वाहनांचा अपघात होण्याची शक्यता असल्याने त्वरित कारवाई व्हावी, अशा आशयचे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांनी दिले आहे.


अजून बातम्या वाचा..

विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

शाळा सोडल्यानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावर शाळेच्या दाखल्यावर जन्मतारीख, स्वतःचे नाव, वडिलांचे...

read more
दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

पावसाने पाठ फिरविल्यामुळे मतदार संघात दुष्काळ सदृश्य परिस्तिथी निर्माण झाली असून आज पाऊस जरी पडला...

read more
.