Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

Oct 1, 2026

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, आणखी १९ तालुक्यांमध्ये #दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पाच पिकांचे २० टक्के सर्वेक्षण व ग्राउंड ट्रथिंग करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आले.

१९ तालुक्यांची जिल्हानिहाय नावे :

नांदेड – मुदखेड, मुखेड व अर्धापूर

चंद्रपूर – जिवती, ब्रह्मपुरी व बल्लारपूर

गोंदिया – आमगाव, देवरी, सालेकसा व गोंदिया

वर्धा – कारंजा

भंडारा – मोहाडी व तुमसर

नाशिक – त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाड

सातारा – पाटण

सांगली – शिराळा व वाळवा

दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पीकपंचनामे तातडीने पूर्ण करणे, जनावरांसाठी चारा आणि नागरिकांसाठी पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करणे, तसेच प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांकडून कर्जवसुली करताना कोणतीही सक्ती करू नये, याबाबत राष्ट्रीयकृत, खासगी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांना सूचना देण्यात येणार आहेत.

आगामी काळातील चारा टंचाई लक्षात घेऊन उपलब्ध भागातून आवश्यक ठिकाणी चारा पोहोचविण्यासाठी ‘सिलो’ व्यवस्थापनासह प्रभावी पर्यायांचा अभ्यास करून उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. पाणीटंचाईच्या परिस्थितीत गरजेनुसार लहान क्षमतेच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यावर भर देण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांतील प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये आणि विविध विभागांनी समन्वयाने उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचनाही देण्यात आल्या.

अजून बातम्या वाचा..

शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सेवा त्वरित सुरू करा अध्यापकभारतीची मागणी

शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सेवा त्वरित सुरू करा अध्यापकभारतीची मागणी

राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षांचे केंद्र विद्यार्थ्यांच्या शाळेतच देण्यात आली असली तरी ग्रामीण...

read more
भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांची दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय समिती सदस्य पदी नियुक्ती

भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांची दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय समिती सदस्य पदी नियुक्ती

भारत सरकार च्या रेल्वे मंत्रालय द्वारे रेल्वे विभागीय समिती पुनर्गठन कार्यक्रम अंतर्गत भारत...

read more
बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम संपन्न

बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम संपन्न

सालाबादाप्रमाणे यंदाही बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]