Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

जि.प. शाळा आणि अंगणवाडयांना मिळणार डीपीसी मधून निधी

Oct 4, 2026

ग्रामीण भागातील जि. प. शाळा तसेच अंगणवाड्यांसाठी राज्य शासनाने विशेष योजना आखली असून जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत (डीपीसी) ग्रामपंचायतींना दिल्या जाणाऱ्या ‘जनसुविधांसाठी विशेष अनुदान’ योजनेची व्याप्ती वाढविली आहे. जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी केंद्रांच्या इमारती, स्वच्छता, वीज, सुरक्षा आणि संरक्षणाशी संबंधित कामांचा या योजनेत समावेश करण्यात आला असून त्यामुळे ग्रामीण भागातील शाळा आणि अंगणवाडी केंद्रांसाठी डीपीसीतून निधी मिळणार आहे.

जिल्हा परिषद शाळा किंवा अंगणवाडी केंद्रासाठी नवीन इमारत बांधणे अथवा वर्गखोली बांधण्यासाठी कमाल २० लाख तर जुन्या शाळा किंवा अंगणवाडी इमारतींची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करण्यासाठी पाच लाख रुपयांपर्यंत खर्च करता येणार आहे.

शाळा व अंगणवाडी केंद्रांमध्ये आवश्यक स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यासाठी शौचालय बांधकाम किंवा दुरुस्तीसाठी तीन लाख रुपयांपर्यंत खर्चाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर शाळा व अंगणवाडी केंद्रांवर सौरऊर्जा यंत्रणा बसविणे तसेच इमारतीचे विद्युतीकरण करण्यासाठी पाच लाख रुपयांपर्यंत खर्च करता येणार आहे.

शाळा आणि अंगणवाडी केंद्रांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षण भिंत बांधण्यासाठी पाच लाख रुपयांपर्यंत खर्च करता येणार आहे. विशेषतः मोकळ्या जागेत असलेल्या शाळा किंवा अंगणवाडी केंद्रांच्या परिसराला सुरक्षित कुंपण अथवा संरक्षण भिंत उभारण्यास या निधीचा उपयोग होईल. सीसीटीव्ही आधारित दृश्य निरीक्षण यंत्रणा आणि अग्निशमन यंत्रणा बसविण्यालाही या योजनेतून निधी देता येणार आहे. या कामासाठी कमाल तीन लाख रुपयांची खर्चमर्यादा निश्चित करण्यात आली आहे

अजून बातम्या वाचा..

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]