Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

अधिसूचित संस्थांना दिली जाणारी कर सवलत होणार रद्द? ७ तारखेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

Oct 5, 2026

भारतात सोने-चांदीची मागणी नेहमीच मजबूत असते. मात्र, या मौल्यवान धातूंची मोठ्या प्रमाणात परदेशातून आयात होत असल्याने सरकारचीही चिंता वाढते. अशातच आता सोने, चांदी आणि प्लॅटिनमच्या आयातीशी संबंधित एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे. वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या (GST Council) बैठकीत बँका आणि काही अधिसूचित संस्थांना मिळणारी करसवलत रद्द करण्याच्या प्रस्तावावर विचार होऊ शकतो. हा निर्णय झाल्यास त्याचा परिणाम भविष्यात मौल्यवान धातूंच्या किमती आणि व्यापारावर परीणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या भारतात सोने, चांदी आणि प्लॅटिनमच्या आयातीवर ३ टक्के एकात्मिक वस्तू व सेवा कर (IGST) आकारला जातो. मात्र, बँका आणि सरकारने निश्चित केलेल्या काही अधिसूचित संस्थांना या धातूंच्या आयातीवर या करातून सूट देण्यात आली आहे. ही सवलत २०१७ मध्ये देण्यात आली होती. त्या वेळी मौल्यवान धातूंची आयात काही मोजक्या मार्गांनी होत होती. व्यापार सुलभ करणे हा या सवलतीमागील सरकारचा उद्देश होता.
मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे सरकार ही करसवलत रद्द करण्याचा विचार करू शकते. परिणामी, बँकांना मिळणारी जीएसटीमधील सूट संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होऊ शकते. या परिषदेत केंद्र सरकार आणि राज्यांचे अर्थमंत्री सहभागी होतात. जर करसवलत रद्द करण्याचा निर्णय झाला, तर बँका आणि अधिसूचित संस्थांनाही सोने, चांदी व प्लॅटिनमच्या आयातीवर ३ टक्के IGST भरावा लागेल. यामुळे या संस्था आणि बुलियन एक्स्चेंज यांच्यातील करासंबंधीची तफावत कमी होऊ शकते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अहिंसा व समतेचे प्रतिक अग्रकुल प्रवर्तक छत्रपति महाराजाधिराज अग्रसेन जी भगवान यांचा...

read more
अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल च्या विध्यार्थ्यांनी मनमाड सार्वजनिक वाचनालयास  दिली क्षेत्र भेट.

अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल च्या विध्यार्थ्यांनी मनमाड सार्वजनिक वाचनालयास दिली क्षेत्र भेट.

    अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल च्या विध्यार्थ्यांनी मनमाड...

read more
मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

कालची मनमाड - अहिल्यानगर रोड वर घडलेल्या अपघातात 19 वर्षीय तरुणीने आपला जीव गमावल्याची घटना ताजी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]