Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाडच्या १७ खेळाडूंची निवड

Oct 8, 2026

   

राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाडच्या १७ खेळाडूंची निवड

छत्रे विद्यालयाच्या ११ खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी;

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक आणि नाशिक जिल्हा वेटलिफ्टिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने १७ व १९ वर्षे मुले-मुलींच्या नाशिक विभागीय शालेय शासकीय वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन जय भवानी अद्यावत व्यायामशाळा, मनमाड येथे करण्यात आले.

या स्पर्धेत नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील तब्बल ७० मुले व ५१ मुली, अशा एकूण १२१ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमुळे स्पर्धेत चांगलीच चुरस निर्माण झाली.

स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर मुकुंद आहेर, वेटलिफ्टिंग प्रशिक्षक अविनाश महाजन, जे. के. पाटील सर आणि वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांच्या हस्ते करण्यात आले.

मनमाड परिसरातील विविध शाळांमधील खेळाडूंनी स्पर्धेत दमदार कामगिरी करत आपल्या गुणवत्तेची छाप पाडली. विशेष म्हणजे छत्रे न्यू इंग्लिश स्कूल, मनमाड या एकाच शाळेतील तब्बल ११ खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होणे ही विशेष अभिमानाची बाब ठरली आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू

अवधूत एकनाथ आव्हाड (माध्यमिक विद्यालय, जातेगाव), यश दिलीप अहिरे (छत्रे न्यू इंग्लिश स्कूल, मनमाड), ध्रुव केशव पवार (माध्यमिक विद्यालय, वागदर्डी), शिवम रवींद्र आहेर (मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालय, मनमाड), यश सुनील सहस्त्रबुद्धे (गुड शेफर्ड्स, मनमाड), आयुष आनंद गांगुर्डे (सरस्वती विद्यालय, मनमाड), श्रेया वाल्मीक सोनार, मनस्वी राहुल गवळी, संचिता सचिन गांगुर्डे, श्रावणी दीपक मंडलिक, खुशबू गजेंद्र चूद्रे, मुग्धा संतोष माळी आणि प्रांजल शरद आंधळे (सर्व छत्रे न्यू इंग्लिश स्कूल, मनमाड), शामल प्रदीप तायडे (माध्यमिक विद्यालय, वाघदर्डी), वैष्णवी आतिश शुक्ला (मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालय, मनमाड), अक्षरा सुहास व्यवहारे (गो. य. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जळगाव चोंडी) आणि आनंदी विनोद सांगळे (माध्यमिक विद्यालय, वागदर्डी) या खेळाडूंची अमरावती येथे १३ ते १५ ऑक्टोबर २०२६ दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

उपविजेत्या खेळाडूंचीही दमदार कामगिरी

साई रवींद्र आहेर (माध्यमिक विद्यालय, वाघदर्डी), श्लोक निलेश पाटील (के. आर. टी., मनमाड), साई दत्तू कोल्हे व चिराग राहुल बागुल (छत्रे न्यू इंग्लिश स्कूल, मनमाड), साहिल रामदास जाधव (कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अनकवाडे), ओम राजेंद्र पाटील (कला, वाणिज्य महाविद्यालय, मनमाड), भाग्यश्री संदीप पवार (छत्रे न्यू इंग्लिश स्कूल) आणि हर्षिता निळकंठ कुणगर (माध्यमिक विद्यालय, वाघदर्डी) यांनी द्वितीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.

तसेच आर्या पगार, कावेरी वाबळे आणि तुषार पवार यांनीही स्पर्धेत चांगली कामगिरी बजावली.

या सर्व खेळाडूंना जय भवानी व्यायामशाळेत छत्रे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक व अनुभवी वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित प्रशिक्षण दिले जाते. सकाळ-संध्याकाळ सातत्याने सुरू असलेल्या प्रशिक्षणातून खेळाडूंनी केलेल्या मेहनतीचे आणि शिस्तबद्ध सरावाचे हे यश असल्याचे मानले जात आहे.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी नरेंद्र खैरे, पवन निर्भवणे, श्रद्धा माळवतकर, प्राजक्ता खालकर, करुणा गाढे, पंकज त्रिवेदी, निलेश पाटील, मुकुंद आहेर, जयराज परदेशी, आयुष देवगिरी आणि कृष्णा शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

या यशाबद्दल जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष पोपटशेठ बेदमुथा, डॉ. विजय पाटील, मोहन अण्णा गायकवाड, डॉ. सुनील बागरेचा, प्रा. दत्ता शिंपी, नगराध्यक्ष योगेश पाटील, छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी. जे. दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, मुख्याध्यापक प्रसाद पंचवाघ, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, वागदर्डी विद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश जैन, मुख्याध्यापक संतोष भराडे तसेच महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

मनमाडच्या मातीत घडलेले हे युवा वेटलिफ्टर आता राज्यस्तरावर आपल्या कामगिरीची छाप पाडण्यासाठी सज्ज झाले असून, त्यांच्या यशामुळे मनमाडच्या वेटलिफ्टिंग परंपरेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

अजून बातम्या वाचा..

कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

  शनिवार, दि.08 फेब्रुवारी 2026 रोजी कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

  मनमाड शहर भाजपा च्या वतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक व भाजपा च्या कार्यकर्त्यांन चे प्रेरणा...

read more
एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

  मनमाड : इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 केंद्र क्रमांक 0236 एच.ए....

read more
शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

      मनमाड : येथील शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या सिद्धी क्लासेस...

read more
नरेंद्रजी मोदी 3-0 सरकारचा ऐतिहासिक अर्थ संकल्पा मध्ये देशातील “युवा शक्ती केंद्र बिंदू.”देशाच्या प्रगतीची गती  वाढवणारा गतिमान अर्थ संकल्प ~नितीन पांडे

नरेंद्रजी मोदी 3-0 सरकारचा ऐतिहासिक अर्थ संकल्पा मध्ये देशातील “युवा शक्ती केंद्र बिंदू.”देशाच्या प्रगतीची गती वाढवणारा गतिमान अर्थ संकल्प ~नितीन पांडे

संपूर्ण जगात सतत युद्ध जन्य परिस्थिती चे संकट असताना भारताचे शक्तिशाली पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी  निमित्त गुरुवार दिनांक 05/02/2026 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम🚩

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 05/02/2026 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम🚩

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]