Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मालेगाव वृत्तपत्र संघटनेतर्फे ९ ऑक्टोबरला मोर्चा

Oct 8, 2026

स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळ व्हावे, यासाठी मागील अनेक वर्षांपासून वृत्तपत्र विक्रेता बांधव लढा देत आहेत. कल्याणकारी मंडळाची घोषणा झाली; मात्र त्याची अंमलबजावणी न केल्याने येथे मालेगाव वृत्तपत्र संघटनेतर्फे कुटुंबीयांसोबत अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर ९ ऑक्टोबरला सकाळी अकराला मोर्चा काढला जाणार आहे. मोर्चात मालेगावसह ‘कसमादे’तील वृत्तपत्र विक्रेते सहभागी राहणार असल्याचे राज्य संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. वृत्तपत्र विक्रेते ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता जनतेपर्यंत सत्य पोहचविण्याचे काम करीत आहे. या कष्टकरी असंघटित कामगार क्षेत्रातील घटकाला कोणत्याही प्रकारची सामाजिक किंवा आर्थिक सुरक्षितता मिळालेली नाही. राज्य शासनाने वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेला मंजुरी दिली, तरी दोन वर्ष उलटूनही हा निर्णय कागदावरच आहे. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या अहवानाला प्रतिसाद देत मालेगाव वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष पापांना यादव व राज्य संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ९ ऑक्टोबरला अपर जिल्हाधिकारी कार्यालयांवर कुटुंबीयांसोबत मोर्चा काढला जाणार आहे. मोसम चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात होणार आहे. मोर्चात वृत्तपत्र विक्रेते बांधव कुटुंबासह उपस्थित राहतील. येथे अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता होणार असल्याचे यादव यांनी सांगितले.

अजून बातम्या वाचा..

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]