Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

Oct 8, 2026

कालची मनमाड – अहिल्यानगर रोड वर घडलेल्या अपघातात 19 वर्षीय तरुणीने आपला जीव गमावल्याची घटना ताजी असतानाच अशाप्रकारच्या घटना मनमाड -चांदवड या राष्ट्रीय महामार्गावर घडू नयेत यासाठी मनमाड शहरातून जाणाऱ्या मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ G वरील वाढती वाहतूक, अपघातांचे प्रमाण तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीचे नांदगाव विधानसभा प्रमुख, माजी नगराध्यक्ष मनमाड तथा कृषी उत्पन्न बाजार समिती, मनमाडचे सभापती गणेश जगन्नाथ धात्रक यांनी आज दि. ०८ ऑक्टोबर २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) कार्यकारी अभियंता श्रीमती नेहते मॅडम यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर निवेदन दिले.

मनमाड शहरातून जाणाऱ्या मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने, मालवाहू वाहने, प्रवासी वाहने तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ असते. तसेच विविध ठिकाणी वाहतूक कोंडी, रस्त्यालगतची अतिक्रमणे व अपघातप्रवण परिस्थिती निर्माण होत असल्याने नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच स्थानिक वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर धात्रक यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड गेट क्र. १ व २ समोर, डोणगाव चौफुली, सोनावाला कॉम्प्लेक्स समोर, तांबोळी कॉम्प्लेक्स समोर तसेच शहजादी शाळेसमोर आणि बुरुकुलवाडी सुरू होण्यापूर्वी व त्यानंतरच्या परिसरात तातडीने वाहतूक नियंत्रण व रस्ता सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली.

यामध्ये स्पीड ब्रेकर, वेगमर्यादा दर्शविणारे फलक, ब्लिंकर/फ्लॅशर लाईट, स्ट्रीट लाईट, रिफ्लेक्टर, रोड मार्किंग, चेतावणी फलक तसेच आवश्यक त्या इतर रस्ता सुरक्षा उपाययोजना तातडीने करण्याची मागणी करण्यात आली. तसेच मनमाड शहरातून जाणाऱ्या महामार्गाची संपूर्ण सुरक्षा ऑडिट करून अपघातप्रवण व धोकादायक ठिकाणे निश्चित करून त्या ठिकाणी वेगनियंत्रणाची प्रभावी व्यवस्था करण्याची मागणीही करण्यात आली.

यावेळी श्रीमती नेहते, कार्यकारी अभियंता यांनी मनमाड–चांदवड रोडची लवकरच प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याची व अपघातप्रवण ठिकाणांची योग्य पाहणी करण्यात येईल. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

मनमाड शहरातील नागरिकांच्या जीवितासंबंधीचा हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून, केवळ अपघात घडल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी अपघात होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करणे आवश्यक आहे, अशी भूमिका धात्रक यांनी यावेळी मांडली.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी   रुपये 1,09,000/- किंमतीचे विक्रमी शिल्लक औषधं संकलन ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रुपये 1,09,000/- किंमतीचे विक्रमी शिल्लक औषधं संकलन ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथील कवि रबिंद्रनाथ टागोर एज्युकेशन सोसायटीचे २३ वर्ष पूर्ण करून २४ व्या वर्षात पदार्पण

मनमाड येथील कवि रबिंद्रनाथ टागोर एज्युकेशन सोसायटीचे २३ वर्ष पूर्ण करून २४ व्या वर्षात पदार्पण

मनमाड शहरातील अग्रगण्य अशा या शिक्षणसंस्थेचा २३ वा वर्धापन दिन कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल आणि...

read more
गुरुद्वारा मध्ये येणाऱ्या भाविकांनी पवित्र्य राखावे – मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंहजी यांचे आवाहन

गुरुद्वारा मध्ये येणाऱ्या भाविकांनी पवित्र्य राखावे – मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंहजी यांचे आवाहन

मनमाड : मनमाड शहरातील गुरुद्वारा हा आपल्या भारत देशातील शिख धार्मियांचा अत्यंत पवित्र आणि मुख्य...

read more
मनमाड साहित्य संघ आयोजित काव्यस्पर्धेची अंतिम फेरी व* पारितोषिक वितरण समारंभ येत्या २७  फेब्रुवारी रोजी.

मनमाड साहित्य संघ आयोजित काव्यस्पर्धेची अंतिम फेरी व* पारितोषिक वितरण समारंभ येत्या २७ फेब्रुवारी रोजी.

मराठी भाषा गौरव दिनानिमिताने कार्यक्रम मनमाड(प्रतिनिधी)- मनमाड साहित्य संघाने आयोजित केलेल्या...

read more
मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या उपक्रमात नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच पत्रकारांनी हातात झाडू घेऊन उद्यानाची संपूर्ण स्वच्छता केली....

read more
नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा “वसंतराव काणे आदर्श तालुका...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]