Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

डोंगराळे प्रकरणातील नराधमाला ‘फाशी’

Oct 16, 2026

मनमाड- (प्रतिनिधी) संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार आणि प्रकरणात आज जलद गती न्यायालयाने आरोपी विजय ऊर्फ शेखर खैरनार याला या प्रकरणी महत्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणातील दोषी विजय खैरनार याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली असून, पीडित मुलीच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत.

साडेचार वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि नंतर हत्या !
विजय खैरनार असे फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी आरोपी खैरनारने डोंगराळे येथील रहिवासी असलेल्या चार वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले होते. यानंतर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिचा खून केला.

पोलिसांनी तपासानंतर विजय ऊर्फ शेखर खैरनार याला अटक केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात आला. यानंतर आता अवघ्या दहा महिन्यात कोर्टाने खैरनारला फाशीची शिक्षा सुनावली आहे. राज्य सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. मालेगाव अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अलीकडेच २२५ पानांचं आरोपपत्र कोर्टात दाखल केलं होतं. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने एकूण २४ साक्षीदार तपासले. यात एका प्रत्यक्षदर्शी महिलेची आणि सात वर्षाच्या अन्य एका मुलीची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली.

या खटल्यात ३० सप्टेंबर २०२६ रोजी न्यायालयाने आरोपीविरुद्धचे गंभीर आरोप सिद्ध झाल्याचे स्पष्ट केले. लैंगिक अत्याचार, हत्या आणि पुरावे नष्ट करण्यासंबंधीच्या आरोपांचा यात समावेश होता. खटल्यादरम्यान एकूण २४ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाने वैद्यकीय पुरावे, न्यायवैद्यक तपासणी आणि DNA पुरावे न्यायालयासमोर मांडले. साक्षीदारांचे जबाब आणि तपासातील कागदपत्रे या खटल्यात महत्त्वाची ठरली.

खटल्याच्या अंतिम टप्प्यात आरोपीला स्वतःची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. त्याच्या वर्तनासंदर्भातील अहवालही न्यायालयात सादर करण्यात आले होते. यामध्ये कारागृहातील अधिकाऱ्यांसह मानसोपचार तज्ज्ञ आणि पोलिसांनी दिलेल्या अहवालांचा समावेश होता.

पिडीत कुटुंबाला १० लाखांची मदत.
या प्रकरणातील निकालाकडे पीडितेच्या कुटुंबीयांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. न्यायालयाने विजय खैरनार याला फाशीची शिक्षा सुनावली असून, पीडितेच्या कुटुंबाला १० लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या या प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे सुनावणीदरम्यान मांडण्यात आलेले पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि आरोपीची बाजू या सर्व बाबींचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. डोंगराळे येथील या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

स्वराज्य चे संस्थापक महापराक्रमी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जयंती निमित्ताने...

read more
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव येथे भव्य...

read more
मनमाड –स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने  अंधेरी येथील होली फॅमिली हायस्कूलमध्ये विज्ञान व गणित तसेच इतर विषयाशी संबंधित शैक्षणिक विषयांवर आधारित आंतर शालेय स्पर्धेत येथील सेंट झेवियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक कामगिरी करून घवघवीत यश मिळवले‌

मनमाड --स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने अंधेरी येथील होली फॅमिली...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

  शनिवार, दि.08 फेब्रुवारी 2026 रोजी कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

  मनमाड शहर भाजपा च्या वतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक व भाजपा च्या कार्यकर्त्यांन चे प्रेरणा...

read more
एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

  मनमाड : इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 केंद्र क्रमांक 0236 एच.ए....

read more
शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

      मनमाड : येथील शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या सिद्धी क्लासेस...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]