Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी आकांक्षा व्यवहारे, मेघा आहेर व श्रावणी पुरंदरे यांची निवड

Oct 23, 2026

     

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी आकांक्षा व्यवहारे, मेघा आहेर व श्रावणी पुरंदरे यांची निवड

मनमाडच्या वेटलिफ्टिंग क्षेत्रासाठी अभिमानास्पद यश; प्रवीण व्यवहारे यांची संघ मार्गदर्शक म्हणून नियुक्ती

मनमाड परिसरातील वेटलिफ्टिंग क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरलेल्या कामगिरीत आकांक्षा किशोर व्यवहारे, मेघा संतोष आहेर आणि श्रावणी विजय पुरंदरे या तीन खेळाडूंची पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे. तसेच, वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांची विद्यापीठाच्या वतीने संघ मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सकलचंद पटेल विद्यापीठ, मेहसाणा (गुजरात) येथे दि. २४ ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय वेटलिफ्टिंग स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना आकांक्षा व्यवहारे ४८ किलो वजनी गटात, मेघा आहेर ५३ किलो वजनी गटात, तर श्रावणी पुरंदरे ५८ किलो वजनी गटात आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.

आकांक्षा व्यवहारे आणि मेघा आहेर या वरिष्ठ महाविद्यालय, वागदर्डी येथे शिक्षण घेत असून, श्रावणी पुरंदरे ही कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण घेत आहे.

या तिन्ही खेळाडूंनी आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर विद्यापीठाच्या संघात स्थान मिळवले आहे. त्यांना लाभलेले प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन आणि त्यांची संघ मार्गदर्शक म्हणून झालेली नियुक्ती हीदेखील वेटलिफ्टिंग क्षेत्रासाठी गौरवास्पद बाब आहे.

या निवडीबद्दल तिन्ही खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत असून, आगामी स्पर्धेत त्या उत्कृष्ट कामगिरी करून विद्यापीठाचा नावलौकिक उंचावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष पोपटशेठ बेदमुथा, डॉ. विजय पाटील, मोहन अण्णा गायकवाड, डॉ. सुनील बागरेचा, प्रा.डॉ. दत्ता शिंपी, नगराध्यक्ष योगेश पाटील, वागदर्डी विद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश जैन, मुख्याध्यापक संतोष भराडे महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मनमाड चे प्राचार्य डॉ.पी.जी.आंबेकर क्रीडा संचालक डॉ सुहास वराडे तसेच महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

अजून बातम्या वाचा..

UPI पेमेंटवर आता शुल्कबाबत महत्वाचा निर्णय – दोन हजारांवरील व्यापारी व्यवहारांवर ०.४ टक्के शुल्क

UPI पेमेंटवर आता शुल्कबाबत महत्वाचा निर्णय – दोन हजारांवरील व्यापारी व्यवहारांवर ०.४ टक्के शुल्क

मनमाड- देशभरातील UPI चा वापर करणारे नागरिक आणि व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून दोन...

read more
मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अहिंसा व समतेचे प्रतिक अग्रकुल प्रवर्तक छत्रपति महाराजाधिराज अग्रसेन जी भगवान यांचा...

read more
अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल च्या विध्यार्थ्यांनी मनमाड सार्वजनिक वाचनालयास  दिली क्षेत्र भेट.

अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल च्या विध्यार्थ्यांनी मनमाड सार्वजनिक वाचनालयास दिली क्षेत्र भेट.

    अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल च्या विध्यार्थ्यांनी मनमाड...

read more
मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

कालची मनमाड - अहिल्यानगर रोड वर घडलेल्या अपघातात 19 वर्षीय तरुणीने आपला जीव गमावल्याची घटना ताजी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]