Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

प्रकृती स्कूलचा दिवाळीचा अनोखा आनंदोत्सव पोलिस बांधवांसोबत

Nov 7, 2026

दिवाळी हा आनंद, प्रेम, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी जपणारा सण. या वर्षाची दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याच्या हेतूने प्रकृती स्कूल मधून एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला शुक्रवार, दिनांक ६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रकृती स्कूल, मनमाड येथील इ.२री च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या वर्गशिक्षिका प्रिया मॅम, निकिता मॅम, स्वरांजली मॅम, तसेच शाळेच्या उपमुख्याध्यापिका प्रीती मॅम व मुख्याध्यापक माननीय सौरभ जैन सर यांच्या समवेत आपल्या समाजाचे खरे रक्षक असलेल्या पोलीस बांधवांना दिवाळीच्या निमित्ताने काही भेटवस्तू देऊन त्यांची दिवाळी आनंदमय व सुखासमधानाची होवो अशा शुभेच्छा दिल्या

या उपक्रमातून समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांच्या कार्याचा सन्मान करण्याचा हा एक सुंदर प्रयत्न होता.

विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यामध्ये आदर, कृतज्ञता, माणुसकी, सहकार्य आणि सामाजिक जाणीव यांसारख्या मूल्यांची रुजवणूक व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पोलीस बांधवांच्या चेहऱ्यावरील समाधान यामुळे वातावरण अधिकच आनंदमय झाले. दिवाळीच्या प्रकाशासोबत प्रेम, आदर आणि *कृतज्ञतेचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.*

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]