Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पशुधनाचा विमा उतरवा

Nov 16, 2026

संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पशुधनाचा विमा उतरवा

डॉ. एन. टी. ताठे : पशुविमा हप्त्यावर ८५ टक्के शासनाचे अनुदान

नांदगाव : प्रतिनिधी

नांदगाव तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पशुपालक शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाला आर्थिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय पशुधन विमा योजनेंतर्गत किमान एक वर्षाचा पशुविमा तातडीने उतरवून घ्यावा, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती नांदगाव डॉ. एन. टी. ताठे यांनी केले आहे.

या योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विमा हप्त्याच्या ८५ टक्के रकमेचे अनुदान शासनाकडून दिले जाते. त्यामुळे पशुपालकांना विमा हप्त्यापोटी केवळ १५ टक्के रक्कम भरावी लागते. प्रत्येक कुटुंबातील जास्तीत जास्त १० पात्र जनावरांचा विमा उतरविता येतो. यामध्ये दुधाळ गाय, बैल, दुधाळ म्हैस, रेडा, शेळी व मेंढी यांचा समावेश आहे.

विमा संरक्षणांतर्गत गाय व बैलासाठी कमाल ७० हजार रुपये, म्हैस व रेड्यासाठी ८० हजार रुपये, तर शेळी व मेंढीसाठी प्रत्येकी ७ हजार रुपये विमा संरक्षण मिळते.

डिजिटल नोंदणी आणि लाभ

या योजनेचा लाभ घेण्यासाठी जनावरांची राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानाच्या पोर्टलवर नोंदणी असणे तसेच कानात १२ अंकी ओळख क्रमांकाचा टॅग असणे आवश्यक आहे. विमा नोंदणीची प्रक्रिया मोबाइलवरील ‘AIC SARAS’ ॲपद्वारे डिजिटल पद्धतीने केली जाते. विम्याची मंजूर रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने पशुपालकांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

नांदगाव तालुक्यातील अनेक शेतकरी कुटुंबांच्या अर्थार्जनाचा पशुधन हा महत्त्वाचा स्रोत आहे. संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. पशुधनाच्या आकस्मिक मृत्यूमुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून जनावरांचा विमा तातडीने उतरवून घ्यावा, असे आवाहन डॉ. एन. टी. ताठे यांनी केले आहे.

— डॉ. एन. टी. ताठे
पशुधन विकास अधिकारी (विस्तार)
पंचायत समिती, नांदगाव, जि. नाशिक

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे, उच्च...

read more
भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
फलक रेखाटन-उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली

फलक रेखाटन-उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली

जागतिक कीर्तीचे तबलावादक ,तालतज्ञ, पदमविभूषण, उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

दोहा कतार येथे १८ ते २१ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या आशियाई यूथ व जूनियर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]