loader image
[ays_poll id=7]

गिरीष दारुंटे यांना राज्यस्तरीय “शिक्षकरत्न” पुरस्कार जाहीर…

Sep 11, 2021

मनमाड : व्ही. एन. नाईक माध्यमिक विद्यालय, मनमाड येथील तंत्रस्नेही शिक्षक श्री. गिरीष वाल्मिक दारुंटे यांना ५ सप्टेंबर शिक्षक दिनी शैक्षणिक दीपस्तंभ संस्थेच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय “शिक्षकरत्न २०२१” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

शैक्षणिक दीपस्तंभ तर्फे शिक्षक दिनी महाराष्ट्रातील शिक्षणक्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, प्राध्यापक व साधनव्यक्ती यांचे प्रस्ताव मागितले होते. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून १८० शिक्षकांनी आपले प्रस्ताव सादर केले. सादर केलेले सर्व प्रस्ताव अतिशय दर्जेदार व शिक्षकांच्या कार्याचे प्रतिबिंब दर्शविणारे होते.

गिरीष दारुंटे हे स्वनिर्मित शैक्षणिक pdf व flipbook उपक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक विषयांवर व वर्षभरात साजऱ्या केल्या जाणारे विविध राष्ट्रीय कार्यक्रम, जयंती / पुण्यतिथी, दिनविशेष इ. सारख्या कार्यक्रमांसाठी आवश्यक सुत्रसंचलन व इतर माहितीचे WhatsApp, युट्युब चॅनल व “ज्ञानज्योती सावित्रीबाई शैक्षणिक ब्लॉग” च्या माध्यमातून राज्यभर पोहचविण्याचे काम निरपेक्षपणे व सहकार्य भावना जोपासत निरंतर करीत असतात.

तसेच त्यांच्या “ज्ञानज्योती सावित्रीबाई शैक्षणिक ब्लॉगला” आजवर जवळपास 5 लाखांपेक्षा जास्त भेटी देवून राज्यातील शिक्षकांनी त्यातील माहितीचा लाभ घेतलेला आहे.

शैक्षणिक कार्याची दखल घेत गिरीष दारुंटे यांना आजवर गुरुगौरव, कलागौरव, कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार, गुणगौरव पुरस्कार, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, राज्यस्तरीय शंभू पुरस्कार, राज्यस्तरीय महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. आ. जगन्नाथरावजी धात्रक, नगराध्यक्षा सौ. पद्मावतीताई धात्रक, मा. नगराध्यक्ष गणेशभाऊ धात्रक, सनी फसाटे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. दरगुडे सर व सहकाऱ्यांनी अभिनंदन केले.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – नांदगाव आणि मनमाड साठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही

बघा व्हिडिओ – नांदगाव आणि मनमाड साठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही

नांदगाव तालुक्यातील मनमाड शहराला दर रोज पाणीपुरवठा व्हावा या दृष्टीकोनातून हिंदुहृदयसम्राट...

read more
लासलगाव जवळ रेल्वे लाईनचे काम करणाऱ्या चार कामगारांना टॉवर वॅगन ट्रेन ने उडवले ; चौघांचा दुर्दैवी मृत्यू

लासलगाव जवळ रेल्वे लाईनचे काम करणाऱ्या चार कामगारांना टॉवर वॅगन ट्रेन ने उडवले ; चौघांचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ आज पहाटे भीषण अपघात झाला आहे. लासलगाव येथे टॉवर वॅगन...

read more
रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या करणार्यांना कडक शासन व्हावे – नांदगाव मनमाड पत्रकार संघाची मागणी

रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या करणार्यांना कडक शासन व्हावे – नांदगाव मनमाड पत्रकार संघाची मागणी

मनमाड : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्त्या करणाऱ्यांना कडक...

read more
मनमाड कुर्ला टर्मिनस गोदावरी एक्सप्रेस कायमस्वरूपी सुरू करा – आमदार कांदे यांची मागणी

मनमाड कुर्ला टर्मिनस गोदावरी एक्सप्रेस कायमस्वरूपी सुरू करा – आमदार कांदे यांची मागणी

मनमाड शहर रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने मनमाड कुर्ला टर्मिनस "गोदावरी एक्स्प्रेस" कायमस्वरूपी...

read more
मुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते करंजवन योजनेचे सोमवारी उद्घाटन – मनमाडला जय्यत तयारी

मुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते करंजवन योजनेचे सोमवारी उद्घाटन – मनमाडला जय्यत तयारी

मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे मनमाड नांदगाव चे आमदार सुहास कांदे यांनी...

read more
अस्थी व रक्षा नदीत विसर्जित न करता घराच्या प्रांगणातील खड्ड्यात दफन करून केली वृक्ष लागवड – मनमाडच्या केदारे कुटुंबीयांनी घालून दिला आदर्श

अस्थी व रक्षा नदीत विसर्जित न करता घराच्या प्रांगणातील खड्ड्यात दफन करून केली वृक्ष लागवड – मनमाडच्या केदारे कुटुंबीयांनी घालून दिला आदर्श

मनमाड - पिताच्या मृत्यूनंतर अस्थी व रक्षा नदीत विसर्जित करण्याच्या प्रथेला फाटा देत मनमाडच्या...

read more
धन्यवाद मोदीजी च्या घोषणांनी वंदे भारत ट्रेन चे मनमाड ला जल्लोषात स्वागत – केंद्रीय मंत्री भारती पवार आणि आमदार कांदेंनी दाखविला हिरवा झेंडा

धन्यवाद मोदीजी च्या घोषणांनी वंदे भारत ट्रेन चे मनमाड ला जल्लोषात स्वागत – केंद्रीय मंत्री भारती पवार आणि आमदार कांदेंनी दाखविला हिरवा झेंडा

वंदे भारत एक्सप्रेस चे शुक्रवारी सायंकाळी मनमाड रेल्वे स्थानकात ढोलताशांचा गजरात आणि नागरिकांच्या...

read more
.