Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – नांदगाव आणि मनमाड साठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही

Feb 13, 2023

नांदगाव तालुक्यातील मनमाड शहराला दर रोज पाणीपुरवठा व्हावा या दृष्टीकोनातून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजना तसेच नांदगाव शहरात उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीचा भूमिपूजन सोहळा आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्याला पालकमंत्री दादाजी भुसे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री तथा दिंडोरी लोकसभेच्या खासदार भारती ताई पवार, भाऊसाहेब चौधरी आदी उपस्थित होते.

पाणी हा मुलभूत प्रश्न असल्याने करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येईल. तसेच विविध विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी बोलताना दिली. या पाणी पुरवठा योजनेसाठी आवश्यक असलेला १५ टक्के निधी राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यामुळे स्थानिकांना दररोज पाणी मिळणार आहे. त्यांच्या दैनंदिन आयुष्यात बदल घडविणारी ही योजना असल्याने यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे यावेळी त्यांनी नमूद केले.

मनमाड नगरपरिषदेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी १० कोटी रुपयांच्या निधीची घोषणा त्यांनी याप्रसंगी जाहीर केली. नांदगाव तालुक्यातील स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी मनमाड येथे एमआयडीसी सुरू करण्याकरिता येत्या नजीकच्या काळात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यासमयी स्पष्ट केले.

ललवाणी उपजिल्हा रुग्णालय, मनमाड या कामांच्या कोनशिलांचे अनावरण करण्यात आले. तसेच फिरते दवाखाने व फिरते कार्यालये असलेली वाहनांचे लोकार्पण करून दिव्यांग बांधवांसाठी सायकलींचे वाटपही याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सुहास कांदे, सुहास कांदे यांच्या पत्नी सौ. अंजुम कांदे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, मालेगाव अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्यासह बाळासाहेबांची_शिवसेना व भाजपा पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्या प्रसंगी संघपती रिखबचंदजी ललवाणी तसेच उद्योगपती अजित सुराणा यांना जीवगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विविध पक्षातील आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.यात प्रामुख्याने राजाभाऊ पगारे माजी नगराध्यक्ष मनमाड, मनमाड चे माजी नगराध्यक्ष बबलू पाटील (राष्ट्रवादी), नांदगाव चे राष्ट्रवादी चे नगरसेवक माजी शहराध्यक्ष बाळ काका कलंत्री, महेंद्र शिरसाठ, दिलीप तेजवानी आदींनी प्रवेश केला. सोहळा यशस्विततेसाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख किरण देवरे, युवा सेना जिल्हाधिकारी फरहान खान, उप जिल्हा प्रमुख सुनील हांडगे, तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे यांसह शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

बारा वर्षानंतर गोदावरी तीरावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा फक्त धार्मिक पर्वणी नाही तर...

read more
अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल च्या विध्यार्थ्यांनी मनमाड सार्वजनिक वाचनालयास  दिली क्षेत्र भेट.

अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल च्या विध्यार्थ्यांनी मनमाड सार्वजनिक वाचनालयास दिली क्षेत्र भेट.

    अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल च्या विध्यार्थ्यांनी मनमाड...

read more
मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

कालची मनमाड - अहिल्यानगर रोड वर घडलेल्या अपघातात 19 वर्षीय तरुणीने आपला जीव गमावल्याची घटना ताजी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]