Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आमदार सुहास कांदेंचे दार्तृत्व ! पुरग्रस्तांना संसारोपयोगी वस्तूंचे वितरण

Sep 12, 2021

नांदगाव शहरात लेंडी नदीला आलेल्या पुराने अनेक कुटुंबांचे जनजीवन विस्कळित होऊन अतोनात नुकसान झाले. शासकीय पातळीवर नुकसानीच्या पंचनाम्याचे काम सुरूच असून आपदग्रस्तांसाठी जीवनावश्यक तसेच संसारोपयोगी वस्तूंचे वितरण तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी करून एक वेगळा आदर्श निर्माण केला. लेंडी नदी लगत वास्तव्याला असणाऱ्या कुटुंबीयांना गॅस सिलेंडर, शेगडी, रेगुलेटर, लायटर, ५० कीलो तांदूळ, हंडे,स्टीलची भांडी, किराणा सामान, ब्लँकेट, महिलांना २ साड्या, पुरुषांना २ ड्रेस अशी जीवनावश्यक सामुग्री उपलब्ध करून दिली.
मी सदैव जनतेसोबतच- आ. कांदे
जीवनावश्यक वस्तूंच्या वितरण प्रसंगी आमदारांच्या निवासस्थानी पूरग्रस्तांना वितरण करण्यात आले.या वेळेस आ.कांदे व सौ.अंजुम कांदे यांनी कुटुंबीयांना धिर देत आम्ही सदैव तुमच्या सोबतच आहोत, डगमगु नका अशा शब्दात धिर दिला.
याप्रसंगी नगराध्यक्ष राजेश कवडे,विलास आहेर,प्रदीप कासलीवाल, किरण देवरे, सुनील जाधव, सागर हिरे आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

जागतिक पर्वत दिनाच्या निमित्ताने मनमाड ट्रेकर्स तर्फे अंकाई किल्ल्यावर पर्वत पूजन व पर्वत रक्षणाची प्रतिज्ञा

जागतिक पर्वत दिनाच्या निमित्ताने मनमाड ट्रेकर्स तर्फे अंकाई किल्ल्यावर पर्वत पूजन व पर्वत रक्षणाची...

read more

छगन भुजबळ,खा प्रफुल पटेल आणि समीर भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासाठी घेतल्या जेष्ठ विधिज्ञांच्या भेटी

ओबीसी आरक्षणावरून देशातील इतर राज्यांना वेगळा आणि महाराष्ट्राला वेगळा नियम का…? असा सवाल उपस्थित...

read more

उपकार्यकारी अभियंता वाटपाटे, यांना नांदगाव मनसे शहराध्यक्ष प्रदीप थोरात यांचा आंदोलनाचा इशारा !

नांदगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी बांधवांच्या हाता तोंडाशी, आलेला घास पावसाने...

read more
खा.शरद पवार यांचे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर व चर्चा सत्र संपन्न!

नांदगाव येथील उद्यानास डॉ.यशवंत बर्वे यांचे नाव द्यावे – प्रतिष्ठित व्यापारी विजय चोपडा यांची मागणी

 नांदगाव येथील दानशूर, सेवाभावी व्यक्तिमत्त्व कर्मयोगी डॉ. य. म. बर्वे यांचे काल निधन झाले. मूळचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]