loader image
[ays_poll id=7]

भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री !!

Sep 13, 2021


गुजरातचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज गांधीनगर येथील राजभवनात शपथ घेतली. ते गुजरातचे 17 वे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्या शपथविधीला गृहमंत्री अमित शाह यांच्यासह 5 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
पटेल यांनी पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार राजभवन येथे दुपारी 2 वाजता शपथ घेतली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनीही शपथविधी कार्यक्रमाला हजेरी लावली.

शाह यांचे स्वागत करण्यासाठी पटेल विमानतळावर पोहोचले होते. या दरम्यान, गृहमंत्र्यांनी त्यांच्या पाठीवर थाप मारली.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
.