Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगावला जिल्हाधिकाऱ्यांची भेट
पूरग्रस्त भागांची केली पाहणी
प्रस्ताव तत्काळ मंजुरीसाठी पाठविणार – मांढरे

Sep 13, 2021

नांदगाव शहरावर उद्भवलेल्या संकटाने अनेक नागरिकांना आपली घरे, दुकाने तसेच अनेकांचे संसार उध्वस्त झाला.परवाच राज्याचे कृषिमंत्री ना. दादा भुसे व तद्नंतर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनीही नांदगावचा दौरा केला होता. त्यानंतर झालेल्या आढावा बैठकीत आमदार सुहास कांदे यांनी आपातकालीन निधीची मागणी नांदगावच्या पूरग्रस्त भागांसाठी केल्याने पालकमंत्री भुजबळ व आमदार कांदे यांच्यामध्ये खडाजंगी झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर काल तत्काळ झालेल्या नियोजन मंडळाच्या बैठकीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाला त्वरित प्रस्ताव पाठवून पूनार्विनियोगाचे आश्वासन दिले होते.
आज जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तत्काळ नांदगावला भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली त्यांचेसमवेत आमदार कांदे, तहसीलदार पाटील, नगर पालिकेचे मुख्याधिकारी घांडे, अभियंता जाधव, पोलीस निरीक्षक कातकडे, विलास आहेर, गुलाब भाबड, तालुका प्रमुख किरण देवरे यांसह नागरिक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024  सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे  जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

  नाशिक, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मा....

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]