loader image
[ays_poll id=7]

महिलांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड नाही – ठाकरे

Sep 14, 2021

साकीनाका प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाला हात घातला असून महिलांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. माता भगिनींची टिंगल टवाळी करणे आणि त्यांच्यावरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत, असे सांगत राज्यात बाहेरून कोण येतो, कोठून येतो, कोठे जातो याची नोंद ठेवा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस महासंचालक कार्यालयात झालेल्या गृह विभागाच्या आढावा बैठकीत दिले आहेत.

आढावा बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले की, महिलांच्या सुरक्षितेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यासाठी गृहविभागाला पूर्ण पाठबळ देण्यात येईल. यातून महिलांवर अत्याचार करणार्‍या नराधमांना वचक बसावा यासाठी जो काही संदेश द्यावा लागेल, त्यासाठी प्रयत्न करा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महिला सुरक्षेशी संबंधित अनेक महत्वाच्या सूचना पोलिसांना केल्या. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये ऑटो रिक्षांचा वापर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावर रिक्षांच्या अनधिकृत हस्तांतरणाला पायबंद घालण्यात यावा. त्याबाबत नोंद करण्यात यावी. तसेच, स्थानिक पोलिसांकडे माहिती देण्याचे संबंधित परवानाधारकाला बंधनकारक करण्यात यावे, अशी महत्वाची सूचना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केली. याचवेळी मुख्यमंत्र्यांनी इतर राज्यातून येणाऱ्यांची नोंद ठेवणे आवश्यक असून ते येतात कुठून जातात कुठे यांची माहिती ठेवावी लागेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

अजून बातम्या वाचा..

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध मनमाड मराठी पत्रकार संघाने केला निषेध

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध मनमाड मराठी पत्रकार संघाने केला निषेध

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना सत्ताधारी गटाच्या लोकप्रतिनीधीच्या कार्यकर्त्यांकडून बेदम...

read more
शिक्षणाला जोड मेहनतीची – मनमाड च्या सुशील पवारने अमेरिकेत शिष्यवृत्तीच्या जोरावर शिक्षण घेत मिळविला बेस्ट  आऊट स्टँडींग अवॉर्ड

शिक्षणाला जोड मेहनतीची – मनमाड च्या सुशील पवारने अमेरिकेत शिष्यवृत्तीच्या जोरावर शिक्षण घेत मिळविला बेस्ट आऊट स्टँडींग अवॉर्ड

अनेकांनी स्वप्न पाहिलेले असते की परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं मात्र हे स्वप्न सत्यात उतरवणे...

read more
बघा व्हिडिओ – रायपूर गावातील शिव रस्ता केला ग्रामस्थांनी बंद – अतिक्रमण हटवून मोजणी करण्याची गावकऱ्यांची मागणी

बघा व्हिडिओ – रायपूर गावातील शिव रस्ता केला ग्रामस्थांनी बंद – अतिक्रमण हटवून मोजणी करण्याची गावकऱ्यांची मागणी

चांदवड तालुक्यातील रायपूर येथील शीव रस्ता शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने बालवाडी तसेच चिमुकल्यांना...

read more
‘अमृत भारत स्थानक योजना’ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील रेल्वेस्थानके चमकणार : डॉ. भारती पवार देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते V .C. द्वारे होणार उद्घाटन

‘अमृत भारत स्थानक योजना’ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील रेल्वेस्थानके चमकणार : डॉ. भारती पवार देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते V .C. द्वारे होणार उद्घाटन

केंद्र सरकारमार्फत रेल्वे मंत्रालयाच्या वतीने अमृत भारत (Amrut Bharat) स्टेशन योजनेतून भुसावळ...

read more
भूमी अभिलेख खात्यातील अजून एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

भूमी अभिलेख खात्यातील अजून एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

नाशिक जिल्ह्यातील प्रशासनातील लाचखोर अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात टिपले जात असून...

read more
.