loader image
[ays_poll id=7]

विराट कोहलीकडे इतिहास घडवण्याची संधी !

Sep 14, 2021

आयपीएल २०२१च्या दुसऱ्या सत्राला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. आयपीएलच्या या सत्रात कर्णधार विराट कोहलीला एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर करण्याची संधी आहे. टी-२० क्रिकेटमध्ये विराट कोहलीला १० हजार धावा पूर्ण करण्यास फक्त ७१ धावांची गरज आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूला १० हजार धावांचा टप्पा पार करता आलेला नाही. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार असलेल्या विराटने आतापर्यंत ३११ टी-२० सामन्यात ९ हजार ९२९ धावा केल्या आहेत. यात पाच शतक आणि ७२ अर्धशतकांचा समावेश आहे. विराटची सरासरी ४१.७१ तर स्ट्राइक रेट १३३.९५ इतका आहे. विराटनंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने टी-२० मध्ये भारताकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. रोहितच्या नावावर ३५० टी-२० सामन्यात ३२.१२च्या सरासरीने ९ हजार ३१५ धावा आहेत. या काळात त्याने ६ शतक आणि ६५ अर्धशतक केली आहेत.

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने ४४४ सामन्यात ३७.०२च्या सरासरीने १४ हजार २१९ धावा केल्या आहेत. गेलच्या नावावर २२ शतक आणि ८७ अर्धशतक आहेत. या यादीत कायरन पोलार्ड ११ हजार १३३ धावांसह दुसऱ्या, पाकिस्तानचा शोएब मलिका १० हजार ८०२ धावांसह तिसऱ्या, ऑस्ट्रेलिाचा डेव्हिड वॉर्नर १० हजार ०१७ धावांसह चौथ्या स्थानावर आहे. विराट पाचव्या स्थानावर आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने १९९ सामन्यात ६ हजार ०७६ धावा केल्या आहेत. यात ५ शतक आणि ४० अर्धशतक आहेत. शिखर धवन ५ हजार ५७७ धावांसह दुसऱ्य तर चेन्नई सुपर किंग्जचा सुरेश रैना ५ हजार ४९१ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

RCBला अद्याप आयपीएलचे एकही विजेतेपद मिळवता आलेले नाही. विराट कोहलीच्या संघाने पहिल्या सत्रात चांगली कामगिरी केली होती. तशीच कामगिरी दुसऱ्या सत्रात करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

अजून बातम्या वाचा..

आंतर शालेय क्रिकेट स्पर्धा – भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडुंचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन

आंतर शालेय क्रिकेट स्पर्धा – भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडुंचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन

मनमाड क्रिकेट समितीद्वारे आयोजीत आंतर शालेय क्रिकेट स्पर्धा नुकत्याच मनमाड येथील महर्षी भगवान...

read more
आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा – गुड शेफर्ड हायस्कूलने मारली बाजी, उपविजेता एच.ए.के.हायस्कूल क्रिकेट संघ

आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा – गुड शेफर्ड हायस्कूलने मारली बाजी, उपविजेता एच.ए.के.हायस्कूल क्रिकेट संघ

मनमाड:- मनमाड क्रिकेट समिती आयोजित महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुल,मनमाड येथे माध्यमिकस्तरीय...

read more
चार नवीन राष्ट्रीय विक्रमासह आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर ला तीन सुवर्णपदक

चार नवीन राष्ट्रीय विक्रमासह आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर ला तीन सुवर्णपदक

नागरकोईल तामिळनाडू येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय युथ, ज्युनिअर व सिनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात… एच.ए.के.हायस्कूल व गुड शेफर्ड हायस्कूल क्रिकेट संघ उपांत्यफेरीत दाखल

आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात… एच.ए.के.हायस्कूल व गुड शेफर्ड हायस्कूल क्रिकेट संघ उपांत्यफेरीत दाखल

मनमाड:- मनमाड क्रिकेट समिती आयोजित महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुल,मनमाड येथे माध्यमिकस्तरीय...

read more
नागरकोईल तामिळनाडू येथे होणाऱ्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी जय भवानी व्यायामशाळेच्या सात खेळाडूंची महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघात निवड

नागरकोईल तामिळनाडू येथे होणाऱ्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी जय भवानी व्यायामशाळेच्या सात खेळाडूंची महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघात निवड

युथ ज्युनिअर व सिनियर गटाच्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन पोंजेसली कॉलेज नागरकोईल...

read more
राज्यस्तरीय शिकाई मार्शल आर्टस् स्पर्धेसाठी मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंची निवड

राज्यस्तरीय शिकाई मार्शल आर्टस् स्पर्धेसाठी मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंची निवड

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
तालुका आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेत भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडुंचे शानदार प्रदर्शन

तालुका आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेत भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडुंचे शानदार प्रदर्शन

नुकत्याच झालेल्या तालुका आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये विविध शालेय संघामध्ये सामने खेळवले गेले...

read more
जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा – ब्रम्हा स्पोर्ट्स आणि क्रीडा प्रबोधिनीने मारली बाजी

जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा – ब्रम्हा स्पोर्ट्स आणि क्रीडा प्रबोधिनीने मारली बाजी

मनमाड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रीडांगणावर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या नाशिक...

read more
जिल्हास्तरीय आष्टेडू आखाडा स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंचे यश

जिल्हास्तरीय आष्टेडू आखाडा स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंचे यश

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.