loader image
[ays_poll id=7]

T20 World Cup नंतर विराट कोहली कर्णधारपद सोडणार?

Sep 15, 2021


आगामी टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आपले कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा सुरु आहे. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषकानंतर विराट कोहलीने टी 20 आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. त्याच्या ठिकाणी रोहित शर्माची वर्णी लागण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. कसोटी संघाचे नेतृत्व मात्र विराटने आपल्याकडेच ठेवण्याचं ठरवलं असल्याचीही माहिती आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या एका वृत्तानुसार, विराटच्या जागी रोहित शर्माकडे टी 20 आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा दिली जाऊ शकते. गेल्या काही दिवसांत विराट कोहलीने या विषयावर संघ व्यवस्थापन आणि रोहित शर्मासोबत अनेकदा चर्चा केल्याची माहिती आहे. विराट कोहलीला जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक समजलं जातं. विराटने आपल्या फलंदाजीवर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. 

विराट कोहलीकडे तीनही प्रकारचे कर्णधारपद असल्याने त्याचा परिणाम फलंदाजीवर होताना दिसत आहे. त्यामुळे त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला तर ते त्याच्या फलंदाजीसाठी चांगलं असेल असं मत काही जाणकारांनी व्यक्त केलं आहे. 

रोहित शर्मा सध्या तीनही प्रकाराच चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तसेच रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचा चषक जिंकला आहे. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये त्याला जगातला सर्वोत्तम ओपनर समजलं जातं. त्यामुळेच त्याच्याकडे कर्णधारपदाची धुरा देण्यासाठी ही योग्य वेळ आहे असं बीसीसीआयच्या सूत्रांचं मत आहे. 


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये आकांक्षा व्यवहारे ने पटकावली तीन सुवर्णपदके

बघा व्हिडिओ : अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये आकांक्षा व्यवहारे ने पटकावली तीन सुवर्णपदके

नगरोटा हिमाचल प्रदेश येथे सुरू असलेल्या अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये ४५ किलो वजनी गटात ६०...

read more
खेलो इंडियामध्ये (मनमाड)नाशिकचे वर्चस्व… मनमाडच्या मेघाला सुवर्ण तर कृष्णाला कांस्य

खेलो इंडियामध्ये (मनमाड)नाशिकचे वर्चस्व… मनमाडच्या मेघाला सुवर्ण तर कृष्णाला कांस्य

चेन्नई : येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील मनमाडच्या मेघा आहेरने...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील  शुभम बिडगरची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील शुभम बिडगरची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात निवड

नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन संघाच्या निवड चाचणीत विविध जिल्ह्य़ातील व तालुक्यातुन खेळाडुंनी...

read more
जनता उच्च माध्यमिक विद्यालय,उमराणे विदयार्थीनींचा संघ नमो चषक तालुकास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत उपविजेता.

जनता उच्च माध्यमिक विद्यालय,उमराणे विदयार्थीनींचा संघ नमो चषक तालुकास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत उपविजेता.

उमराणे:- जि.प. विद्यानिकेतन, देवळा येथे झालेल्या नमो चषक 2024 क्रीडा चषक अंतर्गत देवळा...

read more
.