Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

“गोदावरीच्या राजाचे” यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष….

Sep 15, 2021

मनमाड : मनमाड-मुंबई प्रवास करणाऱ्या शेकडो चाकरमान्यांची जीवनवहिनी असणारी मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेस मध्ये गेल्या 25 वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जात आहे.

1996 पासुन गोदावरी एक्सप्रेस मध्ये गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली , संपुर्ण भारत देशामध्ये धावत्या रेल्वे मध्ये गणेशोत्सव साजरा करत असणारा “गोदावरीचा राजा” हे एकमेव गणेश मंडळ असेल.दरवर्षी दररोज गोदावरी एक्सप्रेसने प्रवास करणारे चाकरमानी हे गोदावरी एक्सप्रेसच्या पासधारक बोगीमध्ये बाप्पाची स्थापना करत असतात. गणेशोत्सवाच्या दहा दिवस या मंडळाकडून बोगीची आकर्षक अशी सजावट करून विविध उपक्रम राबवले जात आसतात , या गणेश मंडळाची विशेषबाब म्हणजे या मंडळाचे सर्वधर्मिय सदस्य असुन सर्वजन एकत्रितपणे हा उत्सव दरवर्षी मोठ्या आनंदात साजरा करत असतात.

गेल्या दोन वर्षांपासून देशात निर्माण झालेल्या कोरोना परिस्थितीमुळे रेल्वे प्रशासनाकडुन देशातील अनेक रेल्वे गाड्या या रद्द करण्यात आलेल्या आहे ,यामध्ये नियमित प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांची जीवनवाहिनी असणारी गोदावरी एक्सप्रेस ही गाडी देखील रद्द असल्याने दरवर्षी आनंदाने साजरा होत असणारा गोदावरीचा राजाचा गणेशोत्सव गेल्या वर्षांपासून साजरा करण्यासाठी मंडळाच्या सदस्यांना अनेक अडचणींचा सामना करून गणेशोत्सव साजरा करावा लागत आहे.गेल्या वर्षी देखील कोरोनाची परिस्थिती असल्याने गोदावरीच्या राजाची स्थापना ही मनमाड रेल्वे यार्डामध्ये एका बोगीमध्ये करण्यात आली होती.

देशातील अनेक रेल्वे गाड्या सुरू होऊन देखील गोदावरी एक्सप्रेस आज देखील सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असल्याने ,यंदाचे गोदावरीचा राजा गणेश मंडळाचे 25 वे रौप्य महोत्सवी वर्ष असुन देखील कोरोना परिस्थितीचा विचार करून गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा नकरता मर्यादित स्वरूपात साजरा केला जात आहे. दरवर्षी मनमाड ते मुंबई शेकडो किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या गोदावरीच्या राजा गणेश मंडळाच्या बाप्पाचा यंदाच्या वर्षी देखील मुक्काम हा मनमाड रेल्वे यार्डातच आहे.

मनमाड रेल्वे यार्डमध्ये रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून देण्यात आलेल्या एका बोगीमध्ये मंडळाकडून सुंदर आणि आकर्षक अशी सजावट करून गणपती बाप्पाची प्रसन्न मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी मंडळाकडून दरवर्षी आयोजित करण्यात येणारे सर्व उपक्रम रद्द करण्यात येऊन सकाळी आणि सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते पुजा आणि आरती करून कोरोनाची शासकीय नियम पाळुन गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.

गोदावरीचा राजा गणेश मंडळाच्या सर्व सदस्यांकडून बाप्पाकडे एकच मागणी करण्यात येत आहे ,की देशात निर्माण झालेली कोरोना परिस्थिती लवकर दुर व्हावी आणि त्यांची रोजची जीवनवाहिनी असणारी गोदावरी एक्सप्रेस लवकर सुरू होऊन पुढील वर्षी साजरा होणार गणेशोत्सव हा गोदावरी एक्सप्रेसमध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात यावा.

शब्दांकन – श्री योगेश म्हस्के , मनमाड.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]