loader image

रक्षक कि भक्षक ? पोलिसानेच केले अल्पवयीन मुलीचे अपहरण!

Sep 16, 2021


नाशिकमधील एका पोलीस शिपायाने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसावर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास शिताफीने अटक करून मुलीची सुटका करण्यात आली आहे. दीपक जठार असे अटक करण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, म्हसरूळ परिसरात पीडित मुलीचे वास्तव्य आहे. रविवारी दुपारी पीडिता घरातून बाहेर गेली, ती रात्र पर्यंत न आल्याने पीडित मुलीच्या वडिलांनी आपल्या ओळखीचा पोलीस कर्मचारी दीपक जठार याच्याशी संपर्क साधला असता, तुम्ही काळजी करू नका, मी शोध घेतो असे सांगत मुलीच्या वडिलांना धीर दिला. मात्र, रात्र उलटूनही मुलगी परत न आल्याने वडिलांनी सकाळी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत पीडित मुलीच्या मोबाईलचा तंत्रविश्लेषण शाखेच्या मदतीने माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोबाईल बंद असल्याने तपासात अडचणी येत होत्या. पीडितेच्या वडिलांनी सोमवारी पुन्हा जठार याच्याशी संपर्क केला, तेव्हा त्याने मुलीला ठक्कर बाजार येथे कारमध्ये ठेवत तालुका पोलीस ठाण्याच्या समोर पीडितेच्या वडिलांना भेटायला बोलवले.

पीडितेच्या वडिलांना जठारवर संशय आल्याने त्यांनी ही बाब पोलिसांना सांगितली. पोलिसांनी जठारच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला असता तो बंद असल्याचे निदर्शनास आले. शेवटच्या कॉलच्या आधारे तंत्रविश्लेषण शाखेच्या मदतीने माग काढला असता औरंगाबाद रोडवर त्याचे लोकेशन मिळून आले. पोलीस पथक तात्काळ तेथे रवाना झाले. नांदूरनाका येथे एमएच 15 इडब्ल्यू 9990 या क्रमांकाच्या कारमधून जठारला अटक केली व मुलीची सुखरूप सुटका केली.

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो

दीपक जठार विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. जठार हे दोन मुलांचे वडील असून पीडित मुलगी त्याच्या मोठ्या मुलापेक्षा काही वर्षांनी मोठी आहे.

अजून बातम्या वाचा..

मालेगावातील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार – पालकमंत्री दादा भुसे यांनी केली होती मागणी

मालेगावातील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार – पालकमंत्री दादा भुसे यांनी केली होती मागणी

मनमाड : मालेगाव तालुक्यातील अजंग येथे (दि. १४ मे) रोजी अल्पवयीन मुलगी भाविका (रिया) ज्ञानेश्वर...

read more
नांदगाव शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नारधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

नांदगाव शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नारधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

नांदगाव : प्रतिनिधी येथील अल्पवयीन पीडित मुलीवर अत्याचार करुन तिच्याशी गैर वर्तन करणाऱ्या नराधमास...

read more
बघा व्हिडिओ : विवेकानंद नगर मधील मंदीरातील दान पेटी चोरट्यानी  केली लंपास ; मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद

बघा व्हिडिओ : विवेकानंद नगर मधील मंदीरातील दान पेटी चोरट्यानी  केली लंपास ; मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद

मनमाड शहरात चोरीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत असतांनाच चोरट्यांनी आपला मोर्चा ...

read more
बघा व्हिडिओ – लासलगाव येथे सराफी दुकानात भरदिवसा तीन तोळ्याची पोत चोरण्याचा प्रयत्न

बघा व्हिडिओ – लासलगाव येथे सराफी दुकानात भरदिवसा तीन तोळ्याची पोत चोरण्याचा प्रयत्न

लासलगाव ( ठिणगी वृत्तसेवा ) लासलगाव शहरातील मेनरोड वरील अत्यंत वर्दळ असलेल्या ठिकाणी एका नामांकित...

read more
.