loader image
[ays_poll id=7]

सिडकोने गृहनिर्माण प्रकल्प राबविताना मोकळ्या जागा, पार्किंग आदींचे नियोजन करावे – अजित पवार

Sep 17, 2021

सिडकोच्या नवीन वसाहतींची निर्मिती करताना पुढील 25 वर्षांचा विचार करून नियोजन करावे. वाहनांसाठी पुरेसे पार्किंग, मैदाने, बागा यांच्यासाठी खुल्या जागा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल, याकडे लक्ष द्यावे. सर्वसामान्यांना परवडतील अशी घरे देतानाच त्यांची देखभाल सुद्धा त्यांना परवडली पाहिजे, याचा विचार करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले. बेलापूरमधील सिडकोच्या मुख्यालयात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिडकोच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला.

सिडकोच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई मेट्रो प्रकल्प, सुमारे 1 लाख 4 हजार घरांचा गृहनिर्माण प्रकल्प, खारघर येथील आंतरराष्ट्रीय कार्पोरेट पार्क आणि नैना प्रकल्प आदी प्रकल्पांच्या सद्यःस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी आढावा घेतला. यावेळी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री शशिकांत शिंदे, विभागीय आयुक्त विलास पाटील, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

निवडणूक आयोगाचा अभूतपूर्व निकाल – शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला

निवडणूक आयोगाचा अभूतपूर्व निकाल – शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी ४०...

read more
जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी.  नांदगाव सोमनाथ घोंगाणे

जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी. नांदगाव सोमनाथ घोंगाणे

शहरातील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिवजंयती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली...

read more
खेलो इंडिया महिला मानांकन राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाडच्या सहा खेळाडूंची महाराष्ट्र राज्य संघात निवड

खेलो इंडिया महिला मानांकन राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाडच्या सहा खेळाडूंची महाराष्ट्र राज्य संघात निवड

पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पटना बिहार येथे होणाऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय मानांकन...

read more
कांदा निर्यात सुरू करून २००० प्रति क्विंटल हमीभाव मिळावा – मनमाडला महाविकास आघाडीचा रास्ता रोको

कांदा निर्यात सुरू करून २००० प्रति क्विंटल हमीभाव मिळावा – मनमाडला महाविकास आघाडीचा रास्ता रोको

शेतकऱ्याच्या कांद्याला प्रति क्विंटल २००० रुपये भाव द्यावा या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे...

read more
महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर राहणार २४ तास खुले – विविध कार्यक्रमांचे आयोजन

महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर राहणार २४ तास खुले – विविध कार्यक्रमांचे आयोजन

महाशिवरात्रीनिमित्त शनिवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी त्र्यंंबकेश्वर मंदिरात सुमारे तीन लाख शिवभक्त...

read more
.