loader image
[ays_poll id=7]

IPL 2021 – मैदानात प्रेक्षकांचा आवाज घुमणार, प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी!

Sep 17, 2021

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात मैदानात प्रेक्षकांचा आवाज घुमणार आहे. कारण आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात प्रेक्षकांना मैदाना उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या आयोजकांनी याबाबत माहिती दिली. संयुक्त अरब अमिरात (यूएई) मध्ये 19 सप्टेंबरपासून आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत. 

क्रिकेट फॅन्स उद्यापासून म्हणजे 16 सप्टेंबरपासून सामन्यांचे तिकीट ऑनलाईन बूक करू शकतील. IPL च्या अधिकृत वेबसाईट www.iplt20.com वरून प्रेक्षकांना तिकिटे खरेदी करता येतील. आयपीएलचे उर्वरित 31 सामने 19 सप्टेंबरपासून खेळवले जाणार आहेत. हे सामने दुबई, शारजाह आणि अबू धाबी येथे मर्यादित प्रेक्षकांसह खेळवले जातील. मात्र किती प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळेल याबद्दल काहीही सांगितले गेले नाही. या दरम्यान, कोविड प्रोटोकॉल आणि यूएई सरकारच्या कोरोना संबंधित नियमांचे पालन केले जाईल. 

मुंबई-चेन्नई यांच्यात रंगणार पहिला सामना

पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) मधील हा सामना दुबई येथे खेळवण्यात येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होईल. पूर्वीप्रमाणे आयपीएल सामने हे दुपारी 3.30 आणि सायंकाळी 7.30 वाजता खेळवण्यात येणार आहे. 

आईपीएल 2021 च्या दुसऱ्या पर्वाचे वेळापत्रक

  • 19 सप्टेंबर – चेन्नई सुपर किंग्ज वि. मुंबई इंडियन्स ( सायं. 7.30)
  • 20 सप्टेंबर – कोलकाता नाईट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू ( सायं. 7.30)
  • 21 सप्टेंबर –  पंजाब वि.राजस्थान रॉयल्स ( सायं. 7.30)
  • 22 सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायजर्स हैदराबाद ( सायं. 7.30)
  • 23 सप्टेंबर – मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट रायडर्स ( सायं. 7.30)
  • 24 सप्टेंबर-  रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु वि. चेन्नई सुपर किंग्ज ( सायं. 7.30)
  • 25 सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स (दुपारी 3.30)
  • सनरायजर्स हैदराबाद वि. पंजाब किंग्ज ( सायं. 7.30)
  • 26 सप्टेंबर – चेन्नई सुपर किंग्ज वि. कोलकाता नाईट रायडर्स  (दुपारी 3.30)
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू वि. मुंबई इंडियन्स  ( सायं. 7.30)
  • 27 सप्टेंबर – सनरायजर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स  ( सायं. 7.30)
  • 28 सप्टेंबर – कोलकाता नाईट रायडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स  (दुपारी 3.30)
  • मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्ज  ( सायं. 7.30 )
  • 29 सप्टेंबर – राजस्थान रॉयल्स वि. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळूरू ( सायं. 7.30 )
  • 30 सप्टेंबर – सनरायजर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्ज ( सायं. 7.30 )
  • 1 ऑक्टोबर – कोलकाता नाईट रायडर्स वि. किंग्ज पंजाब   ( सायं. 7.30 )
  • 2 ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स  (दुपारी 3.30)
  • राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्ज    ( सायं. 7.30)
  • 3 ऑक्टोबर – रॉयल चॅलेंजर्स वि. पंजाब किंग्ज   (दुपारी 3.30)
  • कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायजर्स हैदराबाद ( सायं. 7.30)
  • 4 ऑक्टोबर – दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्ज  ( सायं. 7.30)
  • 5 ऑक्टोबर – राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स   ( सायं. 7.30)
  • 6 ऑक्टोबर – रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु वि, सनरायजर्स हैदराबाद ( सायं. 7.30)
  • 7 ऑक्टोंबर – चेन्नई सुपर किंग्ज वि. पंजाब किंग्ज  (दुपारी 3.30)
  • कोलकाता नाईट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स  ( सायं. 7.30)
  • 8 ऑक्टोबर – सनराजर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स  (दुपारी 3.30)
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू वि. दिल्ली कॅपिटल्स  (दुपारी 3.30)
  • 10 ऑक्टोबर – क्वालीफायर 1
  • 11 ऑक्टोबर – एलीमिनेटर
  • 13 ऑक्टोबर – क्वालीफायर 2
  • 15 ऑक्टोबर फायनल 

अजून बातम्या वाचा..

आंतर शालेय क्रिकेट स्पर्धा – भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडुंचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन

आंतर शालेय क्रिकेट स्पर्धा – भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडुंचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन

मनमाड क्रिकेट समितीद्वारे आयोजीत आंतर शालेय क्रिकेट स्पर्धा नुकत्याच मनमाड येथील महर्षी भगवान...

read more
आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा – गुड शेफर्ड हायस्कूलने मारली बाजी, उपविजेता एच.ए.के.हायस्कूल क्रिकेट संघ

आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा – गुड शेफर्ड हायस्कूलने मारली बाजी, उपविजेता एच.ए.के.हायस्कूल क्रिकेट संघ

मनमाड:- मनमाड क्रिकेट समिती आयोजित महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुल,मनमाड येथे माध्यमिकस्तरीय...

read more
चार नवीन राष्ट्रीय विक्रमासह आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर ला तीन सुवर्णपदक

चार नवीन राष्ट्रीय विक्रमासह आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर ला तीन सुवर्णपदक

नागरकोईल तामिळनाडू येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय युथ, ज्युनिअर व सिनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात… एच.ए.के.हायस्कूल व गुड शेफर्ड हायस्कूल क्रिकेट संघ उपांत्यफेरीत दाखल

आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात… एच.ए.के.हायस्कूल व गुड शेफर्ड हायस्कूल क्रिकेट संघ उपांत्यफेरीत दाखल

मनमाड:- मनमाड क्रिकेट समिती आयोजित महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुल,मनमाड येथे माध्यमिकस्तरीय...

read more
नागरकोईल तामिळनाडू येथे होणाऱ्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी जय भवानी व्यायामशाळेच्या सात खेळाडूंची महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघात निवड

नागरकोईल तामिळनाडू येथे होणाऱ्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी जय भवानी व्यायामशाळेच्या सात खेळाडूंची महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघात निवड

युथ ज्युनिअर व सिनियर गटाच्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन पोंजेसली कॉलेज नागरकोईल...

read more
राज्यस्तरीय शिकाई मार्शल आर्टस् स्पर्धेसाठी मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंची निवड

राज्यस्तरीय शिकाई मार्शल आर्टस् स्पर्धेसाठी मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंची निवड

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
तालुका आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेत भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडुंचे शानदार प्रदर्शन

तालुका आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेत भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडुंचे शानदार प्रदर्शन

नुकत्याच झालेल्या तालुका आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये विविध शालेय संघामध्ये सामने खेळवले गेले...

read more
जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा – ब्रम्हा स्पोर्ट्स आणि क्रीडा प्रबोधिनीने मारली बाजी

जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा – ब्रम्हा स्पोर्ट्स आणि क्रीडा प्रबोधिनीने मारली बाजी

मनमाड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रीडांगणावर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या नाशिक...

read more
जिल्हास्तरीय आष्टेडू आखाडा स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंचे यश

जिल्हास्तरीय आष्टेडू आखाडा स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंचे यश

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.