loader image

बदलत्या जबाबदाऱ्या आणि महिलांचे आरोग्य !

Sep 20, 2021


आजच्या युगात आपण जस-जसे वैज्ञानिक क्षेत्रात प्रगती करीत आहोत आणि जग बदलत चालले आहेत तश्याच महिला वर्गाच्या जबाबदाऱ्या देखील कालानुरूप बदलत आहेत. आधी घरातील कामे सांभाळणारी नारी आज देशातील उच्चतम पदापर्यंत झेप घेत आहे. जग बदलत आहे तसेच नारीशाक्तीने देखील स्वताच्या आरोग्याची देखील तितकीच काळजी घेणे महत्वाचे आहे.या सर्व जबाबदाऱ्यांमध्ये महिला आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. ज्यामुळे त्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. महिलांनी वयाच्या 20 व्या वर्षीनंतर आरोग्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे, असे तज्ञांचे मत आहे.  आरोग्याकडे लक्ष देताना सर्वात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे रोजचा आहार. महिलांनी रोजच्या आहारावर विशेष लक्ष दिले पाहिजे व आहारात पोषक तत्वांचा समावेश केला पाहिजे.

* टोमाटो :

टोमॅटो हे चवीला काहीसे आंबट असतात, कारण यामध्ये सायटीक अॅसिड असते. याशिवाय टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्राही भरपूर असते. हे व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, व्हिटामिन ई आणि व्हिटामिन के चा खूप चांगला स्त्रोत आहे. ही सर्व व्हिटामिन्स आरोग्यासाठी खूप चांगली मानली जातात. यामुळे महिलांनी आपल्या आरोग्यामध्ये टोमॅटोचा समावेश केला पाहिजे.

* दुध :

 
* किवी :

किवी कमी कॅलरीज असणारे एक पौष्टिक फळ आहे. किवीमध्ये फोलेट आणि पोटॅशियम देखील आढळतात. किवी खाल्ल्याने पाचन शक्तीत वाढ होते. तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. किवीमुळे सेरोटोनिन हार्मोन्स वाढतात. हे हार्मोन्स शांत झोपेसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. किवीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. यामुळे आहारामध्ये किवीचा समावेश करा.

* डाळी :

डाळीमध्ये लोह, जस्त, जीवनसत्त्वे, सेलेनियम आणि लाइझिनसारख्या आवश्यक अमीनो अॅसिड असतात. हे कॅल्शियम शोषण्यास मदत करतात. तसेच यामुळे तुमची भूक नियंत्रणात राहते. मूग, मटकी आणि लाल चवळीचा आहारात समावेश केला पाहिजे. कारण याचे पचन करणे फारच सोपे आहे. या डाळींमध्ये जीवनसत्त्वे आणि लोहयुक्त पदार्थ असतात. जी तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अधिक प्रभावी आहेत.


अजून बातम्या वाचा..

गरोदर महिलांची आरोग्य तपासणी: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त शिबिर संपन्न

गरोदर महिलांची आरोग्य तपासणी: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त शिबिर संपन्न

देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सव अंतर्गत गरोदर महिलांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेण्याची केंद्रीय...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये ओपन हार्ट सर्जरी न करता  IVL तंत्रज्ञानाने हृदयशस्त्रक्रिया यशस्वी – डॉ. सचिनकुमार पाटील

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये ओपन हार्ट सर्जरी न करता  IVL तंत्रज्ञानाने हृदयशस्त्रक्रिया यशस्वी – डॉ. सचिनकुमार पाटील

नाशिक | प्रतिनिधी : ओपन हार्ट सर्जरीला पर्यायी " शॉक वेव्ह इंट्रा व्हॅस्क्युलर बलून लिथोट्रिप्सी "...

read more
डॉ प्रणित सोनावणे यांचे ” बायो इंटॅक्ट ” तंत्रज्ञानामुळे सांधे प्रत्यारोपणाचे एका महिन्यात अर्धे शतक

डॉ प्रणित सोनावणे यांचे ” बायो इंटॅक्ट ” तंत्रज्ञानामुळे सांधे प्रत्यारोपणाचे एका महिन्यात अर्धे शतक

नाशिक : प्रतिनिधी  अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाशिक येथील सुप्रसिद्ध सांध्येप्रत्यारोपण...

read more
.