loader image
[ays_poll id=7]

सोमय्या यांच्यावरील कार्यवाहीत मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही – खा.राऊत

Sep 20, 2021

काल भाजपचे माजी खा.किरीट सोमय्या यांच्यावर झालेली कार्यवाही आणि त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात न येण्याची दिलेली नोटीस ते त्याना कराड स्टेशनवर थांबण्याची कार्यवाही असेल यापैकी कोणत्याही कार्यवाहीत मुख्यमंत्री कार्यालयाचा काही संबंध नाही, हे सर्व निर्णय गृह खात्यामार्फत कायदा व सुव्यवथा अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने घेतले गेली असल्याचा खुलासा शिवसेनेचे माजी खासदार संजय राउत यांनी केला.

मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हे सर्व मी स्वत मुख्यमंत्री महोदायासोबत झालेल्या चर्चेनंतर बोलत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एखाद्याच्या कृतीमुळं कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होत असेल तर प्रशासनाला प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार गृहमंत्रालयानं कारवाई केली असावी. त्याच्याशी मुख्यमंत्री कार्यालयाचा अजिबात संबंध नाही. मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची गरज नाही. मुख्यमंत्री अशा लहान गोष्टीत पडत नाहीत, असेही त्यांनी पुढे नमूद केले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
.