loader image

फास्टफूड चाहत्यांनो जरा सावधान !

Sep 23, 2021


आजच्या काळात फास्टफूडला खूप मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात आहे. रोजच्या आहारात फास्टफूडचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. मोठ्या शहरातील परिस्थितीतर खूप चिंतनीय आहे, मोठ्या शहरात तर फास्टफूड म्हणजेच आहार होत असून यामुळे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम, याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. यात सर्वात जास्त प्रमाण आहेत ते चायनीज पदार्थांचे. मोठ्या शहरातील लोक चायनीज पदार्थांना मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत, परंतु चायनीज मध्ये वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमुळे मोठ्या प्रमाणावर मानवी शरीरावर दुष्परिणाम होतात.

चायनिजमध्ये मुख्यत्वे अजिनोमोटो वापरले जाते. सर्वसामान्यपणे अजिनोमोटो म्हणून आपण ज्या पदार्थाला ओळखतो, त्याचे शास्त्रीय नाव मोनोसोडियम ग्लुटामेट असे आहे. हा पदार्थ क्वचितप्रसंगी अगदी कमी प्रमाणात घेतला गेला तर कदाचित फारसा हानिकारक ठरत नाही परंतु अधिक प्रमाणात याचे सेवन करणे शरीरासाठी त्रासदायक ठरू शकते. यामुळे उच्च रक्तदाब, लठ्ठपणा तसेच मानसिक आरोग्य व झोपेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. अजिनोमोटोची चव मिठासारखी लागते. या कारणामुळेच असे सांगितले जाते की ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे. त्यांनी अजिनोमोटो असणारे पदार्थ खाऊ नये.

बाहेरचे चायनीज कधीतरीच खाणाऱ्या किंवा न खाणाऱ्या लोकांना असे वाटते, की ते चायनिज खात नाहीत, त्यामुळे त्यांच्या पोटात अजिनोमोटो जाण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. पण केवळ चायनिज पदार्थांमध्येच अजिनोमोटो असते, असे नाही. अनेक पॅक फूड उत्पादनांमध्येही आजकाल अजिनोमोटोचा वापर करण्यात येतो. घरच्या घरी रेस्टॉरंटसारखे जेवण देणारे मसाले, दोन मिनिटांत बनणारी सूप, मॅजिक मसाले, चिप्स अशा अनेक गोष्टींमध्ये अजिनोमोटो असते. तसेच फ्लेव्हरसाठीही त्याचा वापर केलेला असतो. त्यामुळे चायनिज पदार्थांसोबतच असे पॅक फूड पदार्थही टाळणे आरोग्याच्या दृष्टीने हिताचे ठरते.

– अजिनोमोटोचा अतिवापर डोळ्यांसाठी घातक ठरू शकतो.
– पॅकिंग फूड अधिक प्रमाणात खाल्ल्याने तुमची जाडी वाढू शकते.
– अजिनोमोटो लहान मुलांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळे लहान मुलांना अशा पदार्थांपासून दूर ठेवा.
– हृदयविकार असणाऱ्या लोकांनी अजिनोमोटो खाऊ नये.
– ज्यांना डोकेदुखीचा त्रास आहे, सतत डोके दुखत असते, अशा लोकांनी अजिनोमोटो खाल्ल्यास त्यांचा त्रास आणखी वाढू शकतो. अशा लोकांना मायग्रेनचा त्रासही होऊ शकतो.


अजून बातम्या वाचा..

गरोदर महिलांची आरोग्य तपासणी: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त शिबिर संपन्न

गरोदर महिलांची आरोग्य तपासणी: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त शिबिर संपन्न

देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सव अंतर्गत गरोदर महिलांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेण्याची केंद्रीय...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये ओपन हार्ट सर्जरी न करता  IVL तंत्रज्ञानाने हृदयशस्त्रक्रिया यशस्वी – डॉ. सचिनकुमार पाटील

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये ओपन हार्ट सर्जरी न करता  IVL तंत्रज्ञानाने हृदयशस्त्रक्रिया यशस्वी – डॉ. सचिनकुमार पाटील

नाशिक | प्रतिनिधी : ओपन हार्ट सर्जरीला पर्यायी " शॉक वेव्ह इंट्रा व्हॅस्क्युलर बलून लिथोट्रिप्सी "...

read more
डॉ प्रणित सोनावणे यांचे ” बायो इंटॅक्ट ” तंत्रज्ञानामुळे सांधे प्रत्यारोपणाचे एका महिन्यात अर्धे शतक

डॉ प्रणित सोनावणे यांचे ” बायो इंटॅक्ट ” तंत्रज्ञानामुळे सांधे प्रत्यारोपणाचे एका महिन्यात अर्धे शतक

नाशिक : प्रतिनिधी  अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाशिक येथील सुप्रसिद्ध सांध्येप्रत्यारोपण...

read more
.