क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिवीरांगना हौसाबाई भगवानराव पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. क-हाड येथील कृष्णा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 97 वर्षांच्या होत्या. हौसाबाई पाटील यांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यलढ्यासाठी आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सामाजिक-सांस्कृतिक लढ्यासाठी समर्पित केले. त्या शूर, निर्भीड आणि महान स्वातंत्र्य सेनानी होत्या.
शिक्षक मतदार संघ निवडणूक पुढे ढकलली – शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर घेण्यात येणार
केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाशिक विभागाची शिक्षक मतदार संघाची निवडणूक अखेर पुढे ढकलली...










