मनमाड येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने महाविद्यालयात रांगोळी स्पर्धा मेहंदी स्पर्धा या स्पर्धांच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मतदाराचे कर्तव्य, अधिकार तसेच मतदान केल्याने भारताची लोकशाही अधिक दृढ होईल असे प्रतिपादन केले. रांगोळी स्पर्धेत महाविद्यालयातील विविध विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून रांगोळी व मेहंदी स्पर्धेच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व सांगितले.
या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. विठ्ठल फंड, श्रीमती सुरेखा राजवळ, श्रीमती योगिता शिंदे, सौ शितल हिरे, श्रीमती सुरेखा निकम, महाविद्यालयातील शिक्षक यांनी या स्पर्धेत महत्त्वाची भूमिका बजावली.