loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २६ सप्टेबर ते २ ऑक्टोबर २०२१ !

Sep 26, 2021


  1. मेष राश‍ी :  व्यावहारिक वर्तन राखा. विचारपूर्वक कृती करा. चर्चा करण्यापेक्षा कृतीला महत्त्व असते हे लक्षात ठेवा. सहकाऱ्यांशी जुळवून घेणे हिताचे. कायदे पाळा. 
  2. वृषभ राश‍ी :  तब्येत सांभाळा. हट्ट सोडणे, समजुतदारपणा दाखवणे हिताचे. नियम-कायदे पाळणे लाभाचे. परिस्थिती पाहून निर्णय घेणे सोयीचे.
  3. मिथुन राश‍ी : हुशारीने प्रगती कराल. अविवाहितांच्या विवाहाचे योग आहेत. प्रेमात यशस्वी व्हाल. घरच्यांना वेळ द्याल. नोकरीत स्थैर्याला महत्त्व देणे हिताचे. कोणाची मदत घ्यावी आणि कोणाची नाही हे विचारपूर्वक ठरवणे हिताचे.  
  4. कर्क राश‍ी : कामातून ओळख तयार कराल. प्रतिष्ठा वाढेल, कौतुक होईल. संवाद सुरू ठेवा पण वाद टाळा. जोडीदाराला वेळ द्या.
  5. सिंह राश‍ी : अतिरेक टाळा. क्षमता ओळखून वागा. गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. संवादातून प्रश्न सोडवाल. कौतुक होईल. आर्थिक व्यवहारांत पारदर्शकता राखा. 
  6. कन्या राश‍ी : व्यावहारिक वर्तन राहील याची खबरदारी घ्या. पूर्ण खात्री करुन नंतर मोठे निर्णय घ्या. वाद टाळणे हिताचे. प्रसंगी परिस्थितीशी जुळवून घेणे सोयीचे. 
  7. तूळ राश‍ी : हुशारीने वागणे, गोड बोलणे हिताचे. जोडीदाराला वेळ द्या. वाद टाळा. प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. प्रगती होईल. 
  8. वृश्चिक राश‍ी : आत्मनिर्भर होणे हिताचे. नियोजनाचा आणि गोड बोलण्याचा लाभ होईल. वाद टाळणे हिताचे. अडचणींतून मार्ग काढाल. शत्रूवर मात कराल. घरच्यांना वेळ द्याल.
  9. धनु राश‍ी : प्रयत्नांमध्ये सातत्य हवे. वाद टाळा. क्षमता ओळखून कृती करा. नियोजन लाभाचे. 
  10. मकर राश‍ी : हुशारीने प्रगती कराल. अडचणींतून मार्ग काढाल. ज्येष्ठांची आणि गुरुजनांची सेवा करण्याचा योग आहे. क्षमता ओळखून कृती करा. स्वतःशी प्रामाणिक राहा. 
  11. कुंभ राश‍ी :  नियोजनाने आणि वाद टाळण्याने जास्त लाभ होईल. मौन बाळगणे किंवा गोड बोलणे यामुळे अनेक अडचणी दूर होतील. प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. कायदे पाळणे हिताचे. 
  12. मीन राश‍ी :  शब्द जपून वापरणे हिताचे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने महत्त्वाचे निर्णय घेणे फायद्याचे. निर्णय विचारपूर्वक, सर्व शक्यतांचा अंदाज घेऊन घेतल्यास लाभ होईल. आत्मनिर्भर होणे लाभाचे. आर्थिक नियोजन करणे फायद्याचे.

अजून बातम्या वाचा..

.