Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सांगा साहेब! पटतय का !! शिवसेना जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड यांचा भुजबळांना थेट सवाल

Sep 26, 2021

जिल्हा नियोजन समितीत (डी पी डी सी ) पालकमंत्री मा.श्री. छगनरावजी भुजबळ साहेब यांनी जो दुजाभाव चालवला आहेत. त्यावरून राजकारण विकास सोडून कोणत्या दिशेने चालले आहेत हे लक्षात येते. शासन नियम सम-समान निधी वाटपाचा असताना भुजबळ साहेब फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी नांदगाव मतदार संघाकडे हेतुपुरस्कर कानाडोळा करीत आहेत.

भुजबळ साहेब! महाराष्ट्रात पक्षभेद विसरून आदरणीय श्री.शरद पवार साहेब व शिवसेना पक्षप्रमुख,मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे साहेब ह्या दोन महानेत्यांच्या नेतृत्वात ही महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाला बरोबर घेऊन उदयास आली.महाराष्ट्राचा विकास हा एकच मुद्दा डोळ्यासमोर ठेवून. असे असताना साहेब तुम्ही दुजाभाव का करीत आहे? आघाडीत बिघाडी व्हावी असे तुम्हाला वाटते का ?
आमदार सुहास आण्णा कांदे यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट सांगितले की आम्ही महाविकास आघाडीत असून माझ्या हातून चुकीचे काही घडणार नाही. “अन्याय होत असेल तर मी कायदेशीर मार्गाने लढा देईल” परंतु तुम्ही आजपर्यंत ह्यावर स्पष्टीकरण दिलेलं नाहीत.
साहेब!
देशातील बलाढय अशा भाजपा पक्षाविरोधात आपण सर्व एकत्र येऊन लढत आहोत. महाविकास आघाडीतील मंत्री,आमदार यांना विविध प्रकारे भाजपा त्रास देत आहे.त्याची झळ तुम्हाला सुद्धा बसलेली आहेत. याची जाणीव तुम्हाला असताना आज ही तुम्ही त्याच बुरसटलेल्या विचारांनी काम करीत आहात . साहेब! तुम्ही शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला होता!परंतु जेव्हा तुम्ही मातोश्रीची पायरी चढली आणि ठाकरे कुटुंबाप्रती कृतघ्नता दाखविली तेव्हाच आम्ही तमाम शिवसैनिकांनी झाले गेले गंगेला वाहिले.असे समजून तुम्ही जेल मधे असताना तुमच्यावर या वयात अन्याय झाला म्हणून असंख्य शिवसैनिक हळहळ व्यक्त करीत होते.
साहेब! दहा वर्ष तुमच्या सुपुत्राने नांदगाव विधानसभेचे नेतृत्व केले परंतु ह्या दहावर्षाचा कालखंडात तालुक्याचा काय विकास झाला ?असा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारा.वीज,पाणीप्रश्न,बेकारी यापैकी एक तरी प्रश्न तुम्ही सोडविला का ? उलट PWD,प्रांतकार्यालय,डी.एड.कॉलेज येवला येथे नेले.
तुमच्या विविध संस्था असताना तालुक्यातील किती बेरोजगारांना तुम्ही तुमच्या संस्थेत नोकऱ्या दिल्या, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असताना तुम्ही मनमाडचा पाणीप्रश्न का सोडविला नाही ? असे विविध प्रश्न उपस्थित होतात.तुम्ही तुमची तीच बुरसटलेली विचारधारा बदलली नाही म्हणूनच तालुक्यातील जनतेने ज्यांच्याकडे कोणतेही सत्तापद नसताना,जनतेला दुष्काळी परिस्थितीत स्वखर्चाने पाणी पाजले, नैसर्गिक आपत्ती आली असताना पदरमोड खर्चाने गॅस, भांडीकुंडी, कपडे मदत केली , कोरोनाच्या काळात हजारो लोकांना घरपोच जेवण दिले .असा शिवसेनेच्या विचारधारेचा पाईक असलेला, सर्व सामान्य जनतेचा जनाधार मिळालेला आमदार श्री सुहास आण्णा कांदेच्या माध्यमातून तालुक्याला लाभला.
कोरोनाच्या महामारीत विकास खुंटला असा अपप्रचार केला जात होता.सहिष्णुता दुबळी आहे असा गैरसमज पसरविला जात होता, तेव्हा त्या साहिष्णूच्या उंबरठ्याशी असलेला लाव्हारस सुहास आण्णा कांदेच्या माध्यमातून उफाळून निघाला आणि खऱ्या अर्थाने नांदगाव तालुक्यात विकासाची गंगा वाहू लागली.
मदतीचा यज्ञ मांडत असताना आज तो यज्ञ प्रखरतेने प्रज्वलित झाला असून,आता हा यज्ञ कोणीही विझवू शकत नाही. कारण शिवसेना ही सुहास आण्णांची आत्मा, श्वास , स्फूर्तिस्थान आणि विश्वास बनली आहेत.
आजही विकासाचे भगवे रक्त सुहास आण्णाच्या धमन्यामधून वाहात आहे. 24 तास जनतेचा सेवक असलेला आमदार ह्या तालुक्याला लाभलेला आहेत.
हेच आमचे भाग्य आहे आणि म्हणून आम्ही तमाम शिवसैनिक अहोरात्र आण्णाच्या पाठीशी उभे आहोत.
साहेब! आता ही राजकीय नौटंकी बंद करा आणि विकासाच्या पाठीशी उभे रहा हीच विंनती!

 

अजून बातम्या वाचा..

मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मनमाड विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम विद्यालयाचा निकाल सन २०२३-२४ मध्ये ९२.९८% लागला.

मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मनमाड विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम विद्यालयाचा निकाल सन २०२३-२४ मध्ये ९२.९८% लागला.

  मनमाड, मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीचा परीक्षेचा निकाल...

read more
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक श्रावणी अमर चव्हाण हिने ९५.२०% गुण घेवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक श्रावणी अमर चव्हाण हिने ९५.२०% गुण घेवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

    शाळेचे पुढील विदयार्थी गुणानुक्रमाने १ ते ५ क्रमांकाने उत्तीर्ण झाले. गुणानुक्रमांक...

read more
आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्राहकांच्या वतीने युनियन बँक प्रशासना विरोधात फसवणूकचा गुन्हा (FIR) दाखल

आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्राहकांच्या वतीने युनियन बँक प्रशासना विरोधात फसवणूकचा गुन्हा (FIR) दाखल

  मनमाड - शहरातील युनियन बँकेत मनमाड शहर व परिसरातील असंख्य ग्राहकांची खोट्या एफ.डी. व इतरही...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेखचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात दमदार प्रदर्शन – सोलापुर येथे लगावले स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक

भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेखचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात दमदार प्रदर्शन – सोलापुर येथे लगावले स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक

  मनमाड - सोमवार 25 मे 2024, महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 16 (...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]