loader image
[ays_poll id=7]

श्रिया परब – मिस टुरीझम युनिव्हर्स २०२१

Sep 27, 2021

महाराष्ट्रातील सिंधुदुर्गमधील मालवणची श्रिया परबने लेबनान येथे पार पडलेल्या मिस टुरीझम युनिव्हर्स – 2021 स्पर्धेत विजयी होण्याचा मान मिळविला आहे. आशिया खंडातील 22 देशांच्या राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत श्रियाने भारताचे प्रतिनिधित्व केले. ‘मिस टुरिसम युनिव्हर्स आशिया 2021’ हा किताब पटकावून श्रियाने सर्व भारतीयांची अभिमानाने मान उंचावली आहे. यासाठी तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्रियाने तिच्या यशाचे सर्व श्रेय तिचे पालक, तिचे मार्गदर्शक, प्रशिक्षक ऋषीकेश मिराजकर यांना दिले आहे.

मुळची सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील श्रिया परबने मुंबई येथे ऑगस्ट 2021 मध्ये मिस तियारा स्पर्धा जिंकली होती. ही स्पर्धा जिंकल्यानंतर तिला लेबनॉनमध्ये मिस टुरिसम युनिव्हर्स आशिया 2021 स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. श्रियाने पहिल्या दिवसापासूनच जोरदार तयारी करून प्रतिस्पर्धकांच्या मनात धडकी भरवली होती. चाणाक्ष बुद्धिमत्ता आणि सर्वाना घायाळ करणारं सौंदर्य याच्या जोरावर श्रीयाने अंतिम फेरीचं आव्हान देखील यशस्वी पेललं. श्रियाच्या सादरीकरणाने परीक्षकांची मनं जिंकली आणि तिचा विजय निश्चित झाला.

अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
.