loader image
[ays_poll id=7]

महाविकास आघाडीच्या मूळ संकल्पनेला धरूनच स्थानिक पातळीवर आघाड्या !

Sep 30, 2021


राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडी असणार का? या प्रश्नावर महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांकडून वेगवेगळी मतं मांडली जात आहेत. नाना पटोले, संजय राऊत यांनी अनेकदा स्वबळाचा नारा दिला आहे. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी कायम राहावी अशीच आमची भूमिका असल्याचे मत व्यक्त केले आहे, आज ते अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलत होते.

राज्य सरकारने मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धतीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी लोकशाही पद्धातीने विरोध करण्याची भूमिका घेतली. मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धतीचा महाविकास आघाडी सरकारनं निर्णय घेतला आहे. तसा अध्यादेश महाविकास आघाडी सरकारकडून जारी करण्यात आला आहे. हा अध्यादेश राज्यपाल महोदयांकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आला आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाग किती सदस्यांचे असावेत, या मुद्द्यावर महाविकास आघाडीतील पक्षांनी वेगवेगळी मतं मांडली. त्यावर चर्चा होऊन सरकारचा निर्णय झालाय, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. ते अहमदनगरला पत्रकारांशी बोलत होतेय. तसेच स्थानिक पातळीवर आघाड्यांचे योग्य ते निर्णय घेऊ. असे निर्णय तेथील परिस्थितीवर अवलंबून असतील. मात्र, ते करतानाही महाविकास आघाडीच्या मूळ संकल्पनेला धरूनच होतील, असं पाहिलं जाईल. महाविकास आघाडी कायम राहावी, अशीच आमची भूमिका आहे,’ असं जयंत पाटील म्हणाले.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
.