नांदगाव मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे.हिरव्यागार व डौलदार पिकांची डोळ्यासमोर झालेली नासाडी पाहून शेतकरी निराश झाला आहे. अतिवृष्टीमुळे पिकांसोबत जनावरांची देखील गैरसोय होत आहे,शहर,गावांमध्ये अनेक दिवसांपासून पूरपरिस्थिती कायम आहे,अनेकांचा तर संसारच उध्वस्त झाला आहे,सामान्य नागरिकांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे.अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक असलेला शेतकरी बांधव पावसापुढे हतबल झाला आहे.अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना मदतीची व आधार देण्याची गरज आहे,यासाठी महाराष्ट्र शासनाने नांदगाव मतदारसंघ हा ओला दुष्काळ जाहीर करावा आणि त्वरित शासकीय सोपस्कार पूर्ण करून शेतकरी ,सामान्य नागरिक व व्यावसायिकांना मदत देण्याची विनंती आमदार कांदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री वडेट्टीवार यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. 
फलक रेखाटन – दि. 15 ऑगस्ट 2025. 79 वा भारतीय स्वातंत्र्य दिन.
15 ऑगस्ट हा दिवस भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण दिवस आहे. याच दिवशी आपला देश स्वतंत्र होऊन नव्या...












