loader image
[ays_poll id=7]

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून सुभाष साबणे यांना उमेदवारी!

Oct 3, 2021


नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. भाजपने शिवसेनेच्या सुभाष साबणे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. सुभाष साबणे हे माजी आमदार असून त्यांनी या मतदारसंघातून रावसाहेब अंतापूरकरयांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस श्रावण पाटील यांच्या घरी सुभाष साबणे पोहोचले आणि त्यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांची त्यांनी भेट घेतली. या भेटीनंतर देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुभाष साबणे हे भाजपचे अधिकृत उमेदवार असल्याचं जाहीर करण्यात आलं.
 
सुभाष साबणे यांचा अल्प परिचय सुभाष साबणे हे शिवसेनेचे नेते. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. सुभाष साबणे हे मुखेड विधानसभा मतदारसंघातील आमदार होते. त्यानंतर त्यांनी देगलूर येथून विधानसभा निवडणूक जिंकली. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या रावसाहेब अंतापूरकर यांनी सुभाष साबणे यांना पराभूत केलं. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.

अजून बातम्या वाचा..

कंचन ज्वेलर्स आयोजित दिवाळी – नाताळ ऑफर योजनेची सोडत शेकडो ग्राहकांच्या साक्षीने संपन्न

कंचन ज्वेलर्स आयोजित दिवाळी – नाताळ ऑफर योजनेची सोडत शेकडो ग्राहकांच्या साक्षीने संपन्न

मनमाड शहरात सुमारे सात दशकांपासून शुद्धता आणि विश्वासाची परंपरा अबाधित राखत ग्राहकांच्या पसंतीस...

read more
बघा व्हिडिओ – वसतिगृहाच्या सहाव्या मजल्यावरच्या खिडकीतून पडुन विद्यार्थ्याचा मृत्यू

बघा व्हिडिओ – वसतिगृहाच्या सहाव्या मजल्यावरच्या खिडकीतून पडुन विद्यार्थ्याचा मृत्यू

सहाव्या मजल्यावरच्या खिडकीतून खाली पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना कोटा राजस्थान येथे...

read more
.