loader image
[ays_poll id=7]

श्री परशुराम प्रतिष्ठान मनमाड तर्फे गौरी गणपती स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा साजरा..

Oct 5, 2021


श्री परशुराम प्रतिष्ठान मनमाड तर्फे आयोजित गौरी गणपती स्पर्धा 2021 बक्षीस वितरण दिनांक 3 ऑक्टोंबर 2021 रोजी पल्लवी मंगल कार्यालय मनमाड येथे संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ स्मिता शेखर कुलकर्णी ब्राह्मण महासंघ प्रदेश कार्याध्यक्ष लासलगाव या उपस्थित होत्या तसेच सौ आरती भूषण शर्मा अध्यक्ष रोटरी महिला क्लब मनमाड व सौ खुशी कौशल शर्मा सचिव रोटरी क्लब मनमाड या उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री परशुराम प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री समीर कुलकर्णी होते दीपप्रज्वलन व श्री परशुराम प्रतिमापूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शांतीपाठ श्री संकेत जोशी गुरुजी यांनी केला प्रास्ताविक सौ प्रांजली हेमंत लाळे यांनी केले प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सौ प्रांजली लाळे व सौ वैशाली गोडबोले यांनी शाल व श्रीफळ देऊन केला त्यानंतर सौ स्मिता कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले महिलांनी एकत्र येऊन स्त्री शक्ती ची ताकद वाढवावी तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा व आपल्या लहान मुलींना चांगला स्पर्श वाईट स्पर्श याविषयी मार्गदर्शन केले सूत्रसंचालन श्री विकास दादा काकडे यांनी केले चि. युवराज बळेल यांनी स्पर्धकांच्या नावांची घोषणा केली प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले गणपती आरास स्पर्धा विजेते खालील प्रमाणे प्रथम श्री निलेश जाधव द्वितीय श्री साहिल साळस्कर तृतीय सौ मीनाक्षी चंद्रकांत बेंद्रे गौरी आरास स्पर्धा विजेते खालील प्रमाणे प्रथम सौ वृषाली चव्हाण द्वितीय विभागून सौ तीलोत्तमा जोशी व श्री अतुल देशपांडे तृतीय सौ नेहा देशमुख सर्व विजेत्यांना रोटरी महिला क्लब मनमाड यांच्यातर्फे स्मृतिचिन्ह देण्यात आले उत्तेजनार्थ म्हणून श्री किशोर देशपांडे सौ सीमा कुलकर्णी श्री मकरंद मटकर सौ पद्माक्षी कुलकर्णी सौ गौरी अडावदकर सौ चैताली कुलकर्णी कुमारी ज्ञानेश्वरी चंद्रात्रे यांना देण्यात आले तसेच स्पर्धेसाठी चे परीक्षक म्हणून सौ वैष्णवी पुरंदरे सौ नीलिमा धारवाडकर सौ आरती शर्मा सौ वैशाली गोडबोले यांना नेमण्यात आले होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी श्री परशुराम प्रतिष्ठान येवला चे अध्यक्ष श्री बाळासाहेब देशमुख तसेच सौ स्वाती सावरगावकर हे उपस्थित होते त्यांचा श्री समीर कुलकर्णी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या स्पर्धेमध्ये एकूण 50 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र यावेळी देण्यात आले आभार प्रदर्शन श्री आनंद काकडे यांनी केले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी ची आशुतोष गाडगीळ ची पार्थ कानिटकर श्री मंगेश कुलकर्णी ची युवराज बळेल श्री आनंद काकडे यांनी कार्यक्रम पार पाडण्यास मेहनत घेतली यावेळी वेदिका ब्राह्मण महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला सर्व स्पर्धकांनी तसेच सर्व समाज बांधवांनी कार्यक्रमास हजेरी लावली  तसेच रोटरी महिला क्लब मनमाड यांनी स्मृतिचिन्ह प्रायोजित  केल्याबद्दल त्याचे आभार मानण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद :578 विध्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद :578 विध्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

मनमाड - मनमाड सार्वजनिक वाचनालय तर्फे स्व.लोकमान्य टिळक यांच्या 168 व्या जयंती तथा व स्व.अण्णाभाऊ...

read more
मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेला रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांची भेट

मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेला रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांची भेट

प्रतिनिधी मनमाड - येथील मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेमध्ये मंडळ श्रीमती इती पांडे...

read more
राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

  नांदगांव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्यशासनाने ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड -मनमाड शहाराचे सांस्कृतिक सामाजिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद वाक्य...

read more
.