loader image
[ays_poll id=7]

FIHच्या सर्व पुरस्कारांवर भारतीय हॉकी खेळाडूंनी कोरलं नाव!

Oct 6, 2021


टोकियो ऑलिम्पिक २०२०मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला आणि पुरुष हॉकी संघांवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव अजूनही सुरूच आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या (FIH) सर्व पुरस्कारांवर भारतीय महिला आणि पुरुष संघांतील खेळाडू आणि प्रशिक्षकांनी आपलं नाव कोरलं आहे. टीम इंडियाच्या झोळीत ८ पुरस्कार पडले आहेत. भारतीय पुरुष संघाने ४१ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ऑलिम्पिक पदक जिंकले. तसेच महिला संघानेही उपांत्य फेरी गाठून इतिहास रचला. भारताने वर्षातील सर्वोत्तम खेळाडू, वर्षातील सर्वोत्कृष्ट गोलकीपर, या वर्षातील उदयोन्मुख खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक हे पुरस्कार पटकावले आहेत. पुरस्कारांमध्ये भारताने जगभरातील सर्व देशांना क्लीन स्वीप केले आहे.

नॅशनल असोसिएशन, फॅन्स आणि मीडिया या तीन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये या पुरस्कारांसाठी मतदान केले जाते. भारताच्या विजेत्या खेळाडूंनी तिन्ही प्रकारात अव्वल स्थान मिळवले आहे. जगभरात ७९ राष्ट्रीय संघटना आहेत, ज्यांचे प्रशिक्षक आणि कर्णधार त्यांचे प्रतिनिधित्व करतात. असोसिएशनने आशियाईमध्ये ३३ पैकी २९, आफ्रिकेत २५ पैकी ११, युरोपमधील ४२ पैकी १९, ओशनियामधील ८ पैकी तीन आणि पॅन अमेरिकेत ३० पैकी १७ जणांनी मतदान केले होते. त्याच वेळी, ३० हजार विक्रमी संख्येत चाहत्यांनी मतदान केले. ग्राहम रीड हे अजूनही भारतीय संघाचा भाग आहेत. तर शोर्ड मॅरीज्ने यांचा कार्यकाळ टोकियो ऑलिम्पिक नंतर संपला आहे.

महिला –

सर्वोत्कृष्ट खेळाडू – गुरजीत कौर
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक – सविता पुनिया
सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू – शर्मिला देवी
सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक – शोर्ड मॅरिज्ने

पुरुष –

सर्वोत्कृष्ट खेळाडू – हरमनप्रीत सिंग
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक – पी.आर. श्रीजेश
सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू – विवेक प्रसाद
सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक – ग्राहम रीड


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये आकांक्षा व्यवहारे ने पटकावली तीन सुवर्णपदके

बघा व्हिडिओ : अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये आकांक्षा व्यवहारे ने पटकावली तीन सुवर्णपदके

नगरोटा हिमाचल प्रदेश येथे सुरू असलेल्या अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये ४५ किलो वजनी गटात ६०...

read more
खेलो इंडियामध्ये (मनमाड)नाशिकचे वर्चस्व… मनमाडच्या मेघाला सुवर्ण तर कृष्णाला कांस्य

खेलो इंडियामध्ये (मनमाड)नाशिकचे वर्चस्व… मनमाडच्या मेघाला सुवर्ण तर कृष्णाला कांस्य

चेन्नई : येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील मनमाडच्या मेघा आहेरने...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील  शुभम बिडगरची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील शुभम बिडगरची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात निवड

नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन संघाच्या निवड चाचणीत विविध जिल्ह्य़ातील व तालुक्यातुन खेळाडुंनी...

read more
जनता उच्च माध्यमिक विद्यालय,उमराणे विदयार्थीनींचा संघ नमो चषक तालुकास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत उपविजेता.

जनता उच्च माध्यमिक विद्यालय,उमराणे विदयार्थीनींचा संघ नमो चषक तालुकास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत उपविजेता.

उमराणे:- जि.प. विद्यानिकेतन, देवळा येथे झालेल्या नमो चषक 2024 क्रीडा चषक अंतर्गत देवळा...

read more
.