सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला सेनेसह भाजपच्या नेत्यांनी उपस्थिती दर्शविली. केंद्रीयमंत्री नारायण राणे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते.शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी यावेळी जोरदार फटकेबाजी केली.
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यावर सूत्रसंचलनाची धुरा होती. या सोहळ्यास मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते.
सुभाष देसाई यांनी देशातील एक नंबरचे तथा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा केला.

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड
मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...