loader image

“मनमाड महाविद्यालयात रोजगार मेळावा – विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी”

Oct 9, 2025


 

मंगळवार, दिनांक ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे IQAC, प्लेसमेंट सेल व इक्विटास बँक, मनमाड यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळावा यशस्वीपणे आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरुण पाटील होते, तर प्रमुख अतिथी म्हणून सतिश खिरोले उपस्थित होते. प्रारंभी आपल्या संबोधनात प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांविषयी माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांची सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमी पाहुण्यांना अवगत करून दिली. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आजच्या स्पर्धेच्या युगात रोजगार मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकाधिक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. कोणतेही काम मनापासून व आनंदाने केले तर त्यात यश निश्चित मिळते.”

या रोजगार मेळाव्यात एकूण १०३ विद्यार्थ्यांनी Bank Development Officer, Bank Executive Officer व Marketing Manager या पदांसाठी मुलाखती दिल्या. त्यापैकी २३ विद्यार्थी अंतिम निवडीच्या पुढील टप्प्यासाठी पात्र ठरले. या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्राचार्यांनी करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा. देविदास सोनवणे, कुलसचिव श्री. समाधान केदारे, इक्विटास बँकेचे HR Manager श्री. हितेंद्र बोरसे, प्रशांत सोनवणे, गौरी जोशी यांच्यासह प्लेसमेंट सेलचे डॉ. राजाराम जाधव, प्रा. शरद वाघ, प्रा. वसंत गायकवाड, डॉ. सुनील घुगे, प्रा. अमोल बरकले आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

.