loader image
[ays_poll id=7]

भाजपा करणार राज्यव्यापी पर्यावरण रक्षक पंधरवाड्याचे आयोजन !

Oct 10, 2021


महाराष्ट्र प्रदेश भाजपा तर्फे राजकारण करतांना सामाजिक जबाबदारी ची जाणीव ठेवून आगामी काळात पर्यावरण रक्षक पंधरवडा साजरा होणार आहे या भाजपा च्या पर्यावरण रक्षक पंधरवडा सामाजिक अभियान कार्यक्रम ची महाराष्ट्र प्रदेश संयोजक पदी ऍड माधवी नाईक(ठाणे) व प्रदेश सह संयोजक पदी प्रवीण अलई (नासिक) यांना प्रमुख जबाबदारी महाराष्ट्र प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोपवली आहे भाजपाच्या या पर्यावरण रक्षक पंधरवडा कार्यक्रमा अंतर्गत पर्यावरण रक्षण, पर्यावरण संबंधित प्रबोधन ,जनजागृती ,आणि पर्यावरण विकास या संबंधी महाराष्ट्र भाजपा संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमा  चे आयोजन करणार आहे, यात नदी/समुद्र किनारे स्वच्छ करणे ,सांडपाणी नदीत अथवा समुद्रात न सोडता त्यांचा निचरा शोष खड्डा करून करणे,पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व सामजिक संघटना संस्था याना सोबत घेउन वृक्ष संवर्धन मोहीम राबविण्यात येणार आहे.                                                                                                                                                                                       या अंतर्गत राज्यात लागवड झालेल्या सुमारे एक लाख वृक्षांचे सुरक्षित संवर्धन होईल यासाठी संकल्प करण्यात आला आहे. पर्यावरण रक्षण व विकास या विषयावर प्रत्येक जिल्हा निहाय जिल्हा स्तरावर इयत्ता 05 ते इयत्ता 12 पर्यंत च्या विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धा भाजपा आयोजित करणार आहे, राज्यातील मोठ्या शाळांना औषधी वनस्पती वृक्ष लागवडीसाठी भेट देण्यात येणार आहेत, सेल्फी विथ ट्री हे अनोखे अभियान या कार्यक्रमात राबविण्यात येणार आहे. यात आपले शहरातील ,गावातील जुन्या वृक्षा सोबत, तसेच आपण लागवड केलेल्या वृक्षा सोबत ,औषधी वृक्षा सोबत, दत्तक घेतलेल्या वृक्षा सोबत सेल्फी फोटो काढून तो विशिष्ट व्हाट्सएपच्या नंबर वर पाठवायचा आहे ,पर्यावरण संबंधित व्याख्यान ,स्वाक्षरी मोहीम, व इतर प्रबोधन पर कार्यक्रम चे आयोजन या पंधरवाडा कार्यक्रमात भाजपा करणार आहे. कागदी कंदील बनवणे च्या कार्यशाळा चे आयोजन असे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत या संदर्भात भाजपा चे महाराष्ट्र प्रदेश संघटन महामंत्री श्रीकांतजी भारतीय यांचे प्रमुख मार्गदर्शन मध्ये आणि या पर्यावरण रक्षक कार्यक्रमा च्या महाराष्ट्र प्रदेश संयोजक ऍड माधवी नाईक यांचे अध्यक्ष खाली ऑनलाईन व्हर्चुअल बैठकी चे आयोजन करण्यात आले होते यात महाराष्ट्र तील 28 जिल्ह्यातील भाजपा प्रतिनिधी उपस्थित होते राजकारण बरोबरच एक सामाजिक जबाबदारी म्हणून हे अभियान जोरदार यशस्वी करण्यासाठी या बैठकीत नियोजन करण्यात आले.                                                                                                या अभियान कार्यक्रमाचे सह संयोजक प्रवीण अलई यांनी बैठकीचे सूत्र संचालन केले या पर्यावरण रक्षक अभियान कार्यक्रम मध्ये भाजपाचे  सर्व स्तरातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी नी सर्व सामाजिक संघटना नी सहभाग घ्यावा असे आवाहन ऍड माधवी नाईक , प्रवीण अलई यांनी केले आहे.   


अजून बातम्या वाचा..

अंडर 19 क्रिकेट स्पर्धा – भूमी अकॅडमीचा नाशिक पी एस आय अकॅडमीवर रोमांचक विजय. चिराग निफाडकर सामनावीर

अंडर 19 क्रिकेट स्पर्धा – भूमी अकॅडमीचा नाशिक पी एस आय अकॅडमीवर रोमांचक विजय. चिराग निफाडकर सामनावीर

बुधवार दि. 05 एप्रिल 2023 नाशिक क्रिकेट आसोसिएशन आयोजीत हाकीम मर्चंट क्रिकेट स्पर्धेत भूमी क्रिकेट...

read more
बघा व्हिडिओ – दुचाकीवर पुढे तरुणी, मागे तरुणी – दुचाकीस्वाराचा जीवघेणा स्टंट व्हायरल – पोलिसात गुन्हा दाखल

बघा व्हिडिओ – दुचाकीवर पुढे तरुणी, मागे तरुणी – दुचाकीस्वाराचा जीवघेणा स्टंट व्हायरल – पोलिसात गुन्हा दाखल

मुंबईत काही दिवसापुर्वी एका बाईकस्वाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्या व्हिडिओमध्ये एक बाईकस्वार...

read more
बघा व्हिडिओ -विहीर मंजुरीसाठी पैशाची मागणी – तरुण सरपंचाने उधळल्या चक्क दोन लाखांच्या नोटा

बघा व्हिडिओ -विहीर मंजुरीसाठी पैशाची मागणी – तरुण सरपंचाने उधळल्या चक्क दोन लाखांच्या नोटा

छत्रपती संभाजीनगरच्या एका तरुण सरपंचांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ज्यात एका शासकीय...

read more
नांदगावकरांच्या मागणीला अखेर यश – ८ एप्रिल पासून जनता, गोरखपूर कुशिनगर आणि कामायनी एक्स्प्रेसला थांबा मंजूर

नांदगावकरांच्या मागणीला अखेर यश – ८ एप्रिल पासून जनता, गोरखपूर कुशिनगर आणि कामायनी एक्स्प्रेसला थांबा मंजूर

नांदगाव रेल्वे स्थानकावर जनता, गोरखपूर कुशीनगर व कामयानी एक्सप्रेस या गाड्यांचा थांबा अखेर मंजूर...

read more
.