मुंबईत काही दिवसापुर्वी एका बाईकस्वाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्या व्हिडिओमध्ये एक बाईकस्वार बाईकवर धोकादायक स्टंट करताना दिसत होता. त्याच्या पुढे एक तरुणी आणि मागे दुसरी तरुणी देखील बसली होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी देखील संतप्त प्रतिक्रीया दिल्या होत्या आणि त्यांना अटक करण्याची मागणी देखील केली होती. यानंतर वांद्रे कुर्ला पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून फैयाज कादरी असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्या सोबतच्या दोन तरुणींना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

राशीभविष्य : १४ ऑक्टोबर २०२५ – मंगळवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे...